Delhi Red Fort Car Blast: सोमवारी संध्याकाळी देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला. यात स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला. तर २४ हून अधिक लोक जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता ज्या कारमध्ये हा स्फोट झाला. त्या कारचे स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
advertisement
ज्यामध्ये आय-२० कार गर्दीतून जात असल्याचं दिसून आले आहे. कारच्या आत ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला काळा मास्क घातलेला माणूस दहशतवादी मोहम्मद उमर असल्याची माहिती समोर येत आहे. संशयास्पद वाहन दाखवणारे हे फुटेज स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते. हे सीसीटीव्ही फुटेज स्फोटाच्या काही वेळ आधीचे असून लाल किल्ल्याजवळील पार्किंगमधील आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्ता खूप वर्दळीचा असताना एक पांढऱ्या रंगाची आय-२० कार त्या भागातून जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येते. कार चालवणाऱ्या व्यक्तीने आपला चेहरा काळ्या मास्कने झाकलेला होता. तपास यंत्रणा आता कार आणि मास्क घातलेल्या चालकाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
स्फोट झालेली कार कुणाची?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती I 20 कार 2014 पासून तब्बल चार जणांना विकण्यात आली होती. सगळ्यात आधी सलमान नावाच्या व्यक्तीने 18 मार्च 2014 रोजी ही कार विकत घेतली होती. त्यानंतर ती देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली. पुढे ही कार सोनूकडे गेली. अखेरीस ही कार जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी असणाऱ्या तारिकपर्यंत पोहोचली.
या कार खरेदी विक्रीच्या व्यवहारात फरीदाबादमधील एका कार डिलरचाही सहभाग असल्याचं उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कारची मालकी अधिकृतरीत्या बदलण्यात आली नव्हती. ही कार बेकायदेशीरपणे विकण्यात आली होती. घटनेच्या दिवशी ही कार उत्तर दिल्ली परिसरात दुपारी एकच्या सुमारास दिसून आली होती.
