सकाळी 6.10 वाजता पंकज (मोदी) चा मला फोन आला. तो खूप घाबरलेला होता आणि मदतीसाठी याचना करत होता, असे सय्यद इक्बाल यांनी सांगितले. सय्यद बांगड्यांचे विक्रेते असून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मोदी कुटुंबाचे जवळचे मित्र आहेत."आम्ही इथे अडकलो आहोत. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. कृपया मदत करा", पंकजने फोनवर आक्रोश केला, असे इक्बाल यांनी सांगितले. इक्बाल यांना अजून ही तो क्षण आठवतोय. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. पंकज यांचा आवाज इक्बाल यांच्या डोक्यात सतत घुमत आहे.
advertisement
"मी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला. ते दहा मिनिटांत आले. अग्निशमन दलही लवकरच दाखल झाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काळा धूर आणि ज्वालांनी संपूर्ण घर वेढले होते," इक्बाल थरथरत्या आवाजात सांगतात.
गुलजार हौझजवळील एका निवासी इमारतीत ही आग लागली. ज्यात संपूर्ण कुटुंब अडकले. 36 वर्षीय पंकज काही वेळासाठी जळत्या घरातून बाहेर पडला होता, मदतीसाठी कोणी आले आहे का हे पाहण्यासाठी. पण त्याच्या मुलांच्या किंकाळ्या आणि आत अडकलेल्या पत्नीच्या विचारांनी त्याला पुन्हा आत ओढले. तो पुन्हा कधीच बाहेर आला नाही.
दरम्यान, दिलबाग सिंग जो कुटुंबाच्या मोत्याच्या दुकानाला नियमितपणे भेट देत असे. त्याला या घटनेची कुजबुज ऐकू आली. त्याने काळजीने पंकजचा मोठा भाऊ गोविंदा याला फोन केला.
"भैया चले गये... बेहेनें भी नहीं रहीं," (माझा भाऊ गेला... बहिणीही नाहीत), गोविंदा शांतपणे बोलला. मी ते ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीन थरथरली. काल रात्रीच हे कुटुंब एका कार्यक्रमात भेटले होते. गोविंदाने कुटुंबाला रात्री थांबायला सांगितले होते. पण ते रात्री 11 वाजता निघून गेले, सिंग यांनी सांगितले.