TRENDING:

भारताचे 'त्रिकाल', ज्याच्यामुळे चीन, पाकिस्तानलाही फुटेल घाम, PM मोदीही त्यांचे फॅन

Last Updated:

शत्रूच्या कारवायांवर नजर ठेवण्याबरोबरच गुप्तपणे आपली कामगिरी पार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. त्यांची ताकद मोठी असल्याने भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी या भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचं लोकार्पण आज मुंबईतल्या गोदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या युद्धनौका आणि पाणबुडी नौदलात समाविष्ट झाल्यामुळे संरक्षण क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याच्या आपल्या प्रयत्नांना मजबुती मिळेल आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने आपली वाटचाल अधिक सुकर होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. या तिघांना मिळून एकत्रितरीत्या त्रिकाल असं संबोधलं जात आहे. या दोन्ही नौका आणि पाणबुडी भारतात तयार झालेली आहेत. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
भारताचे 'त्रिकाल'
भारताचे 'त्रिकाल'
advertisement

आज लोकार्पण झालेल्या दोन युद्धनौका आणि पाणबुडी चीन आणि पाकिस्तान या आपल्या शेजाऱ्यांसाठी काळ ठरू शकतात. शत्रूच्या कारवायांवर नजर ठेवण्याबरोबरच गुप्तपणे आपली कामगिरी पार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. त्यांची ताकद मोठी असल्याने भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. मुंबईतल्या माझगाव गोदीत त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आयएनएस सुरत ही स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. आयएनएस नीलगिरी ही प्रोजेक्ट 17एची पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे. तसंच, आयएनएस वाघशीर ही स्कॉर्पिन क्लास पाणबुडी आहे.

advertisement

तेव्हा आपण एक राहिलो नाही...; पानिपत शौर्यभूमीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा

आयएनएस वाघशीर

ही पी75 स्कॉर्पिन प्रोजेक्टमधली सहावी आणि अखेरची पाणबुडी आहे. पाणबुडी निर्मितीत भारताची ताकद किती वाढली आहे, हे त्यावरून दिसतं. फ्रान्सच्या नेव्ही ग्रुपच्या सहकार्याने या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. शत्रूच्या रडारमध्ये न दिसता क्षेत्राची टेहळणी करणं, गुप्त माहिती गोळा करणं ही हिची वैशिष्ट्यं आहेत. हाय टेक्नॉलॉजी ध्वनी नियंत्रण, कमी आवाज आणि वातावरणानुसार अनुकूलनाची क्षमता हीदेखील तिची वैशिष्ट्यं आहेत. त्यात 18 टॉर्पीडो आणि ट्यूब लाँच अँटी शिप मिसाइल्सचा वापर करून एकाच वेळी पाण्याखाली किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर शत्रूवर नेमका हल्ला करण्याची क्षमता आहे. ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून, तिची लांबी 67 मीटर आहे. तिचं वजन 1550 टन आहे.

advertisement

आयएनएस नीलगिरी

ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17एमधली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे. तिच्यामुळे सागरी सुरक्षेला एक नवी दिशा मिळेल. 28 डिसेंबर 2017 रोजी ती नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. तसंच, 28 सप्टेंबर 2019 रोजी तिचं लाँचिंग करण्यात आलं होतं. या युद्धनौकेचं वजन 6670 टन असून, तिची लांबी 149 मीटर्स आहे. रडार सिग्नेचर कमी करण्याच्या दृष्टीने तिचं डिझाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे शत्रूच्या नजरेपासून वाचण्यासाठी मदत होते. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सुपरसॉनिक आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी मीडियम रेंज मिसाइल्स यावर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या धोक्यांशी सामना करता येईल. जमिनीवरच्या लक्ष्याचाही भेद यावरून करता येईल, तसंच समुद्राच्या पाण्याखालच्या पाणबुडीचाही वेध यावरून घेता येऊ शकेल.

advertisement

Simpsons Prediction 2025 : 16 जानेवारीला जगावर मोठं संकट! सिम्पसन्सची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरणार? काय घडणार?

नीलगिरीचा वेग ताशी 30 किलोमीटर्स आहे. एअर डिफेन्स गन आणि लांब अंतराच्या 8 सरफेस टू एअर मिसाइल्सनी ही नौका सज्ज आहे. अँटी सरफेस आणि अँटी शिप वॉरफेअरसाठी नीलगिरीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रही आहे. तसंच, अँटी सबमरीन वॉरफेअरसाठी वरुणास्त्र आणि अँटी सबमरीन रॉकेट यांनीही ही नौका सज्ज आहे. नीलगिरीवर दोन हेलिकॉप्टर्स लँड करू शकतात. या नौकेला मल्टि फंक्शन डिजिटल रडार आहे.

advertisement

आयएनएस सुरत

पी15बी गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर योजनेअंतर्गत असलेली चौथी आणि अखेरची युद्धनौका म्हणजे आयएनएस सुरत. जगातल्या सर्वांत मोठ्या आणि विध्वंसक अशा युद्धनौकांमध्ये तिचा समावेश होतो. हिच्या निर्मितीसाठी 75 टक्के स्वदेशी घटकांचा वापर करण्यात आला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रं, सेन्सर्स आणि नेटवर्क आधारित क्षमता ही या युद्धनौकेची वैशिष्ट्यं सांगता येतील.

Longest Working Hours: आठवड्याला सर्वाधिक काम करणारा देश आहे भारताचा शेजारी, टॉप १० मध्ये देशांची यादी वाचा

आयएनएस सुरतची लांबी 163 मीटर्स, तर तिचा ताशी वेग 55.56 किलोमीटर्स आहे. शत्रूच्या रडारमध्ये टिपली जाणार नाही अशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रं त्यावर आहेत. पृष्ठभागावरून हवेत मारा करू शकणारे दोन व्हर्टिकल लाँचर्सही नौकेवर आहेत. प्रत्येक लाँचरच्या साह्याने 16-16 मिसाइल्स डागता येऊ शकतात. ब्राह्मोस अँटी शिप मिसाइल सिस्टीम हेदेखील या नौकेचं वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी 16 ब्राह्मोस मिसाइल्स डागणं शक्य आहे. शत्रूची पाणबुडी नष्ट करण्यासाठी यात रॉकेट लाँचर आणि टॉर्पीडो लाँचरही आहे.

मराठी बातम्या/देश/
भारताचे 'त्रिकाल', ज्याच्यामुळे चीन, पाकिस्तानलाही फुटेल घाम, PM मोदीही त्यांचे फॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल