वडिलांची कोर्टात धाव
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शहजादी खानच्या वडिलांनी 1 मार्च 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्रालय व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी केली होती, जेणेकरून त्यांच्या मुलीच्या कायदेशीर स्थितीबाबत आणि ती सुखरुप असल्याची योग्य माहिती मिळू शकेल. परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देत सांगितले की, शहजादीला 15 फेब्रुवारीलाच फाशी देण्यात आली होती आणि यासोबतच कोर्टाने याचिका निकाली काढली.
advertisement
ऑनलाइन शॉपिंगचा डेंजर अनुभव; 16,680च्या मोबाईल फोनचा बॉक्स उघडताच घाम फुटला
काय आहे संपूर्ण प्रकरण?
33 वर्षीय शहजादी खान डिसेंबर 2021 मध्ये अबू धाबीला गेली होती. ऑगस्ट 2022 मध्ये तिला एका कुटुंबाने त्यांच्या नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले. 7 डिसेंबर 2022 रोजी बाळाला लसीकरण करण्यात आले, परंतु त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टमची शिफारस केली गेली होती. मात्र पालकांनी ती नाकारली आणि चौकशी थांबवण्यासाठी सहमती पत्रावर स्वाक्षरी केली.
फेब्रुवारी 2023 मध्ये शहजादीचा एक व्हिडिओ समोर आला, जिथे तिने बाळाच्या हत्येची कबुली दिली होती. मात्र, तिच्या पालकांचा आरोप आहे की, ती कबुली जबरदस्ती व छळाच्या माध्यमातून मिळवण्यात आली होती.
VIP ग्रुपचा मेंबर झाला, रात्री व्हायचा क्लास; महिन्यानंतर पायाखालची जमीन सरकली
फाशीपूर्वी शेवटचा कॉल आणि न्यायालयीन प्रक्रिया
10 फेब्रुवारी 2023 रोजी शहजादीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि 31 जुलै 2023 रोजी तिला मृत्यूदंड सुनावण्यात आला. सप्टेंबर 2023 मध्ये तिच्या शिक्षेविरोधात अपील करण्यात आले. पण 28 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयाने ती फाशीची शिक्षा कायम ठेवली.
14 फेब्रुवारी 2025 रोजी शहजादीने आपल्या कुटुंबाला शेवटचा फोन केला आणि तिला दोन दिवसांत फाशी दिली जाईल, असे सांगितले. त्यानंतर कुटुंबाला तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
शेअर बाजारात क्रॅश नंतर कॅश! Expert केले मोठे भाकीत, शेअर्सची यादीच दिली
भारत सरकारने या प्रकरणात तिच्या मदतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र अबू धाबीतील कडक कायद्यांमुळे तिचे प्राण वाचवता आले नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
