Online Scam: ऑनलाइन शॉपिंगचा डेंजर अनुभव; 16,680च्या मोबाईल फोनचा बॉक्स उघडताच घाम फुटला

Last Updated:

Scam: ऑनलाइन शॉपिंगचा धक्कादायक प्रकार! कॉलेज कर्मचाऱ्याने 16,680 रुपयांचा मोबाइल ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

News18
News18
नवी दिल्ली: दिल्लीतील शेख सराय येथे ऑनलाइन शॉपिंगशी संबंधित धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन कर्मचाऱ्याने कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे (COD) मोबाईल फोन मागवला. मात्र पार्सल उघडल्यावर त्यात मोबाईलऐवजी साबण आणि बिस्कीट आढळले. यामुळे ई-कॉमर्स डिलिव्हरीची सुरक्षितता आणि ग्राहकांच्या डेटाच्या गैरवापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फसवणुकीचा प्रकार कसा घडला?
पीडित व्यक्तीने ११ फेब्रुवारी रोजी १६ हजार ६८० रुपयांचा मोबाईल ऑर्डर केला आणि कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडला. १२ फेब्रुवारीला एका व्यक्तीचा फोन आला. ज्याने स्वतःला डिलिव्हरी एजंट म्हणून ओळख दिली. त्याने पार्सल दुसऱ्या दिवशी डिलिव्हर करण्याचे ठरले. १३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता एजंटने त्याला पार्सल दिले. ज्यावर प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा लोगो होता.
advertisement
रोहितबद्दल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; TMC नेता म्हणाले, तो संघात असू नये
पीडित व्यक्तीने विश्वास ठेवून १६ हजार ६८० रुपये UPI द्वारे भरले. मात्र ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्याने पार्सल उघडले असता त्यात मोबाईलऐवजी साबण आणि बिस्कीट होते. आश्चर्याचा धक्का बसताच त्याने डिलिव्हरी एजंटला कॉल केला. जिथे सुरुवातीला तक्रार केल्यास समस्या सुटेल असे सांगण्यात आले. मात्र काही वेळाने एजंटचा फोन बंद झाला.
advertisement
दुसऱ्या डिलिव्हरी बॉयने आणले आणखी एक पार्सल!
अत्यंत धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी दुसऱ्या डिलिव्हरी एजंटने मोबाईलचे आणखी एक पार्सल घेऊन येऊन १६ हजार ६८० रुपयांचे पेमेंट मागितले. यामुळे पीडिताला संशय आला आणि त्याने हे पार्सल नाकारले. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांकडे तक्रार केली, ज्यावर FIR दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
advertisement
ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स:
-नेहमी Amazon, Flipkart, Myntra, TataCliq यासारख्या नामांकित वेबसाइट्सवरूनच खरेदी करा.
-कोणत्याही नव्या किंवा अनोळखी ई-कॉमर्स साइटवर खरेदी करण्यापूर्वी reviews आणि ratings तपासा.
-खरी वेबसाइट "https://" पासून सुरू होते, त्यामुळे बनावट साइटपासून सावध राहा.
advertisement
-पेमेंट करण्याआधी डिलिव्हरी एजंटची ओळख पटवा आणि त्याची खात्री करा.
-कोणत्याही व्यक्तीसोबत फोनवर वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
-पैसे भरण्याआधी पार्सल उघडून त्याची खात्री करा.
-ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Online Scam: ऑनलाइन शॉपिंगचा डेंजर अनुभव; 16,680च्या मोबाईल फोनचा बॉक्स उघडताच घाम फुटला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement