लठ्ठ कर्णधार, रोहितबद्दल काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर TMC नेता म्हणाले, तो संघात असू नये

Last Updated:

Team India captain Rohit Sharma: काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार रोहित शर्मावर वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मात्र तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी शमा यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: टीम इंडियाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्यावर टीकेची झोड उठली असताना त्यांना तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की, शर्मा यांची कामगिरी खूपच खराब आहे, त्यामुळे शमा मोहम्मद यांनी काही चुकीचे म्हटलेले नाही. काँग्रेसने मोहम्मद यांना त्यांचे सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यास सांगितले असतानाही त्यांनी सौगत रॉय यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला.
रोहित शर्मा संघात असायला नको 
सौगत रॉय म्हणाले, मी ऐकले आहे की, रोहित शर्माची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यांनी एक शतक झळकावले आहे, पण त्याशिवाय ते दोन-तीन धावा काढून बाद होतात. त्याने संघात असू नये. भारत विजय मिळवत आहे, कारण इतर खेळाडू चांगले खेळत आहेत, पण कर्णधाराचा फारसा हातभार लागत नाही.
advertisement
पाक क्रिकेटपटूने Live शोमध्ये अब्रू घालवली; भीक मागून मिळाले नाही, म्हणून...
शमा मोहम्मद यांनी काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या वजनावर भाष्य करत खेळाडू म्हणून तो लठ्ठ आहे, त्याने वजन कमी करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. तसेच, “तो (रोहित) भारताचा आतापर्यंतचे सर्वांत कमकुवत कर्णधार आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती.
advertisement
काँग्रेसने घेतली दखल, मोहम्मद यांना समज
या वादानंतर काँग्रेसने मोहम्मद यांच्या विधानांपासून हात झटकत ते पक्षाचे मत नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी सांगितले की, शमा मोहम्मद यांनी क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूबद्दल जे काही वक्तव्य केले, ते पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत नाही. त्यांना संबंधित सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
टीकेनंतर पोस्ट हटवल्या, पण वाद कायम
मोठ्या टीकेनंतर शमा मोहम्मद यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले असले तरी वाद संपलेला नाही. भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मोहम्मद यांनी रोहित शर्माला माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एम. एस. धोनी, विराट कोहली, कपिल देव, रवी शास्त्री यांच्याशी तुलना करत त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचा खेळाडू असल्याचे म्हटले होते.
advertisement
काँग्रेसची स्पष्ट भूमिका
काँग्रेसने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खेळाडूंच्या योगदानाचा मोठा आदर करते आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे कोणतेही विधान मान्य करत नाही.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत रोहितने 15 धावा केल्या होत्या. स्पर्धेत भारतीय संघ सध्या अपराजित असून,आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
लठ्ठ कर्णधार, रोहितबद्दल काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर TMC नेता म्हणाले, तो संघात असू नये
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement