IND vs PAK: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने Live शोमध्ये अब्रू घालवली; भीक मागून मिळाले नाही, म्हणून भारताला धमकी दिली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India vs Pakistan Cricket Series: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांनी भारताला थेट आव्हान दिले आहे. जर तुम्ही (भारत) खरोखरच उत्तम संघ असेल तर पाकिस्तानविरुद्ध 10 टेस्ट, 10 वनडे आणि 10 T20 सामने खेळा. मगच खरी ताकद समोर येईल, असे तो म्हणाला.
नवी दिल्ली: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेल्या पाकिस्तान संघाचे आव्हान अवघ्या दोन सामन्यानंतर संपुष्ठात आले. आयोजक पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावर फक्त एक मॅच खेळता आली. पाक संघाच्या या कामगिरीवरून देशात बराच गदारोळ सुरू असताना स्वत:च्या देशातील खेळाडू आणि क्रिकेट बोर्डाच्या चूका सुधारण्यापेक्षा भारतावर टीका, आरोप करण्याची पाकिस्तानच्या माजी खेळाडूंची सवय अद्याप गेलेली नाही. राजकीय तणावामुळे दोन्ही देशात द्विपक्षीय लढती होत नाही. यासाठी पाकिस्तानने अनेक वेळा भारताकडे भीक देखील मागितली आहे. मात्र त्यांची डाळ काही शिजली नाही. आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने क्रिकेट खेळण्यासाठी थेट भारताला धमकी देण्याचा हास्यास्पद प्रकार केला आहे.
कधीकाळी वर्ल्ड क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा आता कोणत्याही संघाकडून सहज पराभव होतोय. पाकिस्तान संघाची भारताविरुद्धची लढत कायम चुरशीची होत असली तरी सध्या यात भारताचे वर्चस्व दिसत आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
नुकत्याच पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघ भारताविरुद्ध केवळ 241 धावांचे आव्हान उभं करू शकला. भारतीय संघाने हे लक्ष्य 42.2 षटकांतच 4 गडी गमावून सहज पार केलं. या विजयात विराट कोहलीच्या शतकाने मोठी भूमिका बजावली.
advertisement
पराभवानंतर पाकिस्तान संघावर टीका
या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानमधील माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. या पराभवामुळे पाकिस्तान संघ थेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.
सकलेन मुश्ताकने भारताला दिले चॅलेंज
एका बाजूला पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चा करायची सोडून भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांनी भारताला थेट खुले आव्हान दिले आहे. पाकिस्तानच्या 24 न्यूज एचडी या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान सकलेन म्हणाला, राजकीय गोष्टी बाजूला ठेवूयात. असे असेल आणि भारताचे खेळाडू खरचं चांगले खेळत असती जर भारत खरोखरच एक उत्तम संघ असेल, तर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 10 टेस्ट, 10 वनडे आणि 10 T20 सामने खेळावेत. मग सर्व गोष्टी क्लिअर होतील. सकलेनने हे वक्तव्य केले तेव्हा त्या शोमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकही देखील होता. मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
advertisement
Saqlain Mustaq (@Saqlain_Mushtaq) 🗣️
"If you (India) are truly a good team, play 10 Test matches, 10 ODIs, and 10 T20Is against us, and it will become clear which team is the best."
pic.twitter.com/wa0k1uoxS8
— M (@anngrypakiistan) March 1, 2025
advertisement
सतत कर्णधार बदलणे, निवड समितीतील वाद, बोर्डाच्या निर्णयांतील अस्थिरता यामुळे पाकिस्तान संघात सुसूत्रता राहिलेली नाही. जर आपण योग्य पद्धतीने तयारी केली आणि संघाला योग्य दिशा दिली, तर आम्ही जगभरातील संघांविरुद्ध चांगली कामगिरी करू शकतो, अगदी भारतालाही पराभूत करू शकतो, असेही सकलेन म्हणाला.
advertisement
BCCI कडून कोणताही प्रतिसाद नाही!
सकलेन मुश्ताकच्या या आव्हानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय मालिका खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती त्यासाठी अनुकूल नाही.
भारत-पाकिस्तान मालिका होईल का?
आता BCCI पाकिस्तानच्या या खुल्या आव्हानाला प्रतिसाद देतं का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच रोमांचक असतो, पण सध्या दोन्ही देश फक्त ICC स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे द्विपक्षीय मालिका कधी खेळली जाईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 02, 2025 6:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने Live शोमध्ये अब्रू घालवली; भीक मागून मिळाले नाही, म्हणून भारताला धमकी दिली