TRENDING:

आकाशात इंधन संपलं, मृत्यूच्या सावटात पायलटने दिला Mayday कॉल; मोठा अपघात टळला, प्रवाशांची थरकाप उडवणारी रात्र

Last Updated:

IndiGo Flight: गुवाहाटीहून चेन्नईकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 6764 ला इंधनाची कमतरता असल्याने बेंगळुरूला वळवावे लागले. विमानाने सुरक्षित लँडिंग केली आणि इंधन भरल्यानंतर चेन्नईला पोहोचले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चेन्नई: गुवाहाटीहून चेन्नईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 6764 ला गुरुवारी तातडीने बेंगळुरूला वळवावं लागलं. या विमानातील पायलटनं Fuel Mayday म्हणजेच इंधनाची कमतरता असल्याची Emergency सूचना दिली.
News18
News18
advertisement

हाती आलेल्या माहितीनुसार चेन्नई विमानतळावर त्या वेळी मोठं विमानतळ ट्रॅफिक होतं. त्यामुळे विमानाला वेळेत लँडिंगची परवानगी मिळू शकली नाही. परिणामी विमानानं चेन्नईच्या आकाशात अनेक फेऱ्या मारल्या आणि त्यामुळे इंधन कमी झाले. विमानात प्रवासीही होते, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते बेंळुरूला वळवण्यात आलं. रात्री 8:15 वाजता विमानानं बेंगळुरूच्या केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर सुरक्षित लँडिंग केलं.

advertisement

यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. इंधन भरण्यात आलं आणि रिफ्रेशमेंट देण्यात आलं. सर्व सुरक्षात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री 10:24 वाजता विमानानं पुन्हा उड्डाण केलं आणि नंतर चेन्नई विमानतळावर यशस्वीपणे लँडिंग केलं. याबाबत DGCA आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना सर्व माहिती देण्यात आली.

गुरुवारी रात्री 8:11 वाजता पायलटनं केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टला ‘फ्युएल मेडे’ मेसेज पाठवला होता. जेणेकरून लँडिंगसाठी तातडीची प्राथमिकता मिळावी. चार मिनिटांनी, म्हणजे 8:15 वाजता विमानानं सुरक्षितपणे लँडिंग केलं.

advertisement

दरम्यान इंडिगोच्या फ्लाइट्समध्ये गेल्या काही दिवसांत सतत बिघाडांच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना इंडिगोच्या दुसऱ्या फ्लाइटसोबत घडली. चेन्नईहून मदुरैकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा चेन्नई विमानतळावर परतावं लागलं. ही फ्लाइट शुक्रवारी सकाळी 7:55 वाजता उड्डाण झाली होती आणि त्यामध्ये 60 हून अधिक प्रवासी होते.

advertisement

उड्डाणाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पायलटनं विमान परत चेन्नईला आणण्याचा निर्णय घेतला. विमानाची सुरक्षित लँडिंग करण्यात आली आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एअरलाईनकडून प्रवाशांसाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली. जेणेकरून त्यांना मदुरैला पोहोचता येईल. या त्रासाबद्दल एअरलाईननं प्रवाशांची माफी मागितली आहे.

मराठी बातम्या/देश/
आकाशात इंधन संपलं, मृत्यूच्या सावटात पायलटने दिला Mayday कॉल; मोठा अपघात टळला, प्रवाशांची थरकाप उडवणारी रात्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल