सुसाईड नोटमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांची नावे नमूद आहेत?
सुसाईड नोटमध्ये, पूरण कुमार यांनी डीजीपी शत्रुघ्न कपूर आणि माजी डीजीपी मनोज यादव यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आयपीएस पूरण यांच्या सुसाईड नोटमध्ये आयपीएस संदीप खिरवार, कला रामचंद्रन आणि अमिताभ ढिल्लन यांच्यावरही छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयपीएस संजय कुमार आणि पंकज नैन यांचाही सुसाईड नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. माजी डीजीपी पीके अग्रवाल आणि आयपीएस शिबास कविराज यांच्यासह माजी मुख्य सचिव टीव्हीएसएन प्रसाद यांनाही यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
advertisement
बायकोचा खुलासा , 'मानसिक छळ' चा उल्लेख
आठ पानांच्या, टाईप केलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या सुसाईड नोटमध्ये, पूरण कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांना आलेल्या असंख्य समस्यांबद्दल सविस्तरपणे सांगितले. अनेक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे. आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की काही अधिकाऱ्यांनी त्यांचा "मानसिक छळ" केला होता. पूरण कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. यांनी बुधवारी या संपूर्ण प्रकरणात कडक कारवाईची मागणी करत दोषी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.
पत्नी आयएएस अधिकारी आहे
दरम्यान, आयपीएस अधिकारी पूरण कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार बुधवारी जपानहून परतल्या. अमनीत आयएएस अधिकारी आहेत आणि हरियाणा सरकारच्या परराष्ट्र सहकार्य विभागाच्या आयुक्त आणि सचिव म्हणून काम करतात. मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत शिष्टमंडळासह अमनीत पी. कुमार जपानला गेल्या. त्या भारतात परतल्यानंतर त्यांनी अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणात अनेकांची नाव समोर अली आहेत. मृत अधिकारी पूरण यांनी लिहिलेल्या त्यांच्या नोटमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाव सामील आहेत.
हेड कॉन्स्टेबलने पूरण कुमारच्या नावाने लाच मागितली का?
दरम्यान, रोहतकमधील एका दारू कंत्राटदाराने एका हेड कॉन्स्टेबलविरुद्ध लाच मागितल्याबद्दल तक्रार दाखल केली. सोमवारी रोहतक पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल सुशील कुमारला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दारू कंत्राटदाराने आरोप केला आहे की हेड कॉन्स्टेबलने पूरण कुमारच्या नावाने अडीच लाख रुपयांची लाच मागितली. पोलिसांनी सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.