इस्रोने काय सांगितलं?
इस्रोने ट्विट केलं की, 'फोर्थ अर्थ बाउंड मॅन्युव्हर (EBN#4)' यशस्वी झाला आहे. इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअरमधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून या उपग्रहाचा मागोवा घेण्यात आला. आदित्य L-1 अंतराळयान 256 किमी x 121973 किमी अंतरावर आहे. भारतीय अंतराळ एजन्सीने म्हटलं आहे, की पुढील मॅन्यूव्हर ट्रान्स-लॅग्रेजियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता केला जाईल.
advertisement
सूर्याच्या जवळ जाऊनही भस्म होणार नाही आदित्य L1? पाहा नेमकं काय आहे कारण
यानंतर आदित्य एल1 पृथ्वीवरून ट्रान्स-लॅग्रेंजियन पॉइंट 1 च्या दिशेने निघेल. आदित्य-L1 ही पहिली भारतीय अंतराळ-आधारित वेधशाळा आहे जी प्रथम सूर्याभोवतीच्या कक्षेत आणि पृथ्वीच्या लॅग्रॅन्जियन बिंदूचा (L1) अभ्यास करेल. Lagrangian बिंदू पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी अंतरावर आहे. आदित्य L1 च्या कक्षा वाढवण्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला.
ISRO पृथ्वीभोवती 16 दिवसांच्या प्रवासादरम्यान आदित्य L1 च्या कक्षा नियमितपणे वाढवत आहे. ज्या दरम्यान अंतराळयान L1 त्याच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक वेग प्राप्त करेल. L1 बिंदूवर पोहोचल्यानंतर, आदित्य L1 ला L1 भोवतीच्या कक्षेत ठेवले जाईल, जी पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षणदृष्ट्या संतुलित जागा आहे.
आदित्य L1 उपग्रह पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणार्या रेषेला जवळजवळ लंबवत असलेल्या अनियमित आकाराच्या कक्षेत L1 भोवती प्रदक्षिणा घालत त्याचे संपूर्ण मिशन पूर्ण करणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ISRO च्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV-C57) ने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून आदित्य-L1 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्या दिवशी, 63 मिनिटे आणि 20 सेकंदांच्या उड्डाणानंतर आदित्य-L1 अंतराळयान पृथ्वीभोवती 235×19500 किमी लंबवर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या ठेवण्यात आलं. आदित्य L1 सौर क्रियाकलाप आणि अवकाशातील हवामानावर होणार्या परिणामांचे निरीक्षण करण्यात अधिक प्रभावी ठरेल.