चार खासदारांसाठी एक मंत्रालय या सूत्रावर जेडीयूकडे १२ खासदार आहेत आणि त्यामुळे त्यांना ३ मंत्रालये हवी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नितीश कुमारांना रेल्वे, कृषी आणि वित्त ही तीन मंत्रालये हवी आहेत. ज्यात रेल्वे मंत्रालय हे नितीश कुमार यांना प्राधान्याने हवे आहे. पक्षाला रेल्वेची गरज आहे कारण नितीश कुमार याआधी रेल्वेमंत्री होते. रेल्वे मंत्रालय हा एक असा विभाग आहे जो जनतेशी संबंधित आहे. या मंत्रालयाशी अधिकाधिक लोक जोडले जाऊ शकतात.
advertisement
महाराष्ट्र, कर्नाटकातील 22 जणांच्या ट्रेकर्सचा ग्रुप हिमालयात वाट चुकला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण अडकले
वित्त कायद्यात बदल करून बिहारला विशेष दर्जा देऊन किंवा बिहारला विशेष पॅकेज देऊन बिहारचा झपाट्याने विकास करता येईल, असे वित्त मंत्रालय जेडीयूला हवे आहे. 2025 मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात आणि केंद्राकडून राज्याकडे पैसे पाठवले गेले तर जे विकास काम केले जाईल, त्यातून लोकांमध्ये मोठा संदेश जाईल, असे जेडीयूचे अर्थमंत्रालयाबाबत म्हणणे आहे.
जेडीयू कृषी मंत्रालयासाठीही आग्रही आहे. याआधी नितीश कुमार यांनी कृषी मंत्री म्हणून काम केलंय. तसंच बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केली, ज्यात शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी समर्पित कृषी फीडर लाइन देणे समाविष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी अजून खूप काम करायचे आहे. आता जेडीयूकडून तीन मंत्रालयांची मागणी केली गेली असली तरी एनडीएच्या बैठकीत काय निर्णय होणार? यावर सर्व अवलंबून आहे.