TRENDING:

दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात, ट्रॉली तलावात बुडाली, 9 भाविकांचा मृत्यू

Last Updated:

विजयादशमीनिमित्त दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात झाला आहे, ज्यात 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
खांडवा : विजयादशमीनिमित्त दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात झाला आहे, ज्यात 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. दुर्गादेवीचं विसर्जन सुरू असताना तलावामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली, ज्यामुळे 9 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुरूवारी मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यामध्ये ही भयावह दुर्घटना घडली आहे. पोलीस महानिरीक्षक (इंदूर ग्रामीण परिक्षेत्र) अनुराग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधना परिसरात ही घटना घडली.
दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात, ट्रॉली तलावात बुडाली, 9 भाविकांचा मृत्यू
दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात, ट्रॉली तलावात बुडाली, 9 भाविकांचा मृत्यू
advertisement

विसर्जन समारंभासाठी जवळच्या गावांमधून मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर भाविक स्वार होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि स्थानिक गोताखोरांच्या मदतीने अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले आहेत, तर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

एसडीआरएफची अतिरिक्त टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. 'या अपघातातून सुमारे पाच ते सहा भाविक बचावले आहेत,' असं आयजी म्हणाले आहेत. तसंच अपघाताची चौकशी सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात, ट्रॉली तलावात बुडाली, 9 भाविकांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल