TRENDING:

पत्नीला युद्धभूमीवरून भारतात परत आणले, Airportवर पती म्हणाला- येथे येण्यापेक्षा तिथे शहीद होणे योग्य

Last Updated:

Israel Iran Conflict: भारत सरकारच्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत इराण-इस्रायल युद्धातून 56 भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले. निदा यांच्या पतीने इराणमध्ये शहीद होण्याचे गौरवाचे विधान केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले जात आहे. अशाच एका ताफ्यात 56 भारतीय नागरिक दिल्लीत दाखल झाले. या युद्धातून परतलेल्या काहींनी सरकारचे आभार मानले असले तरी काहींचे मत वेगळेच होते – त्यांना वाटते की, इराणसारख्या ‘पवित्र भूमी’वर शहीद होणेच खरं गौरवाचं ठरलं असतं.
News18
News18
advertisement

दिल्लीतील रहिवासी निदा या इराणहून परत आल्या. पतीने निदाचे स्वागत करताना एक वादग्रस्त विधान केलं. त्यांनी म्हटलं की,  इराणमध्ये शहीद झालो असतो, तर अमर झालो असतो. शहादत ही सर्वोच्च मृत्यू आहे. येथे परत येण्यापेक्षा तिथे मरण पत्करले असते, तर तेच योग्य ठरले असते.

निदा यांचा अनुभव आणि सरकारचे आभार

निदा यांनी सांगितले की, त्या ३ जून रोजी इराणला गेल्या होत्या. तिथे नेटवर्क कमकुवत असल्यामुळे कोणाशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्या म्हणाल्या, आम्ही सरकारची मदत मागितली आणि त्यांनी आमचं ऐकलं. आम्ही आता सुरक्षित परत आलो आहोत. सीमारेषेवर थोड्याशा अडचणी आल्या, पण नंतर सर्व काही व्यवस्थित पार पडलं.

advertisement

शहीद होणेच अमरत्वाचा मार्ग

निदा यांच्या पतींचे मत मात्र वेगळे होते. त्यांचं म्हणणं आहे की, “इराणची जमीन पवित्र आहे. सध्या तिथे शहीद होण्याची वेळ आहे. आमचे सर्वोच्च नेते म्हणाले आहेत की, शहादत हीच खरी अमरता आहे. गरज पडली तर भारतासाठीही शहीद होऊ, पण आत्ता इराणसाठी शहीद होणं हेच योग्य होतं. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर आणि काही वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
पत्नीला युद्धभूमीवरून भारतात परत आणले, Airportवर पती म्हणाला- येथे येण्यापेक्षा तिथे शहीद होणे योग्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल