अन् काळजात धस्स झाले...
तुषार वाघुळदे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना सांगितले की, माझी पत्नी तिच्या मैत्रिणींसोबत काश्मीर फिरायला गेल्या आहेत. परवा त्यांनी गुलबर्ग सोनबर्ग हा परिसर बघितला. पत्नी आणि तिच्या मैत्रिणी या पहलगाममधील बैसरनमध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पत्नी किशोरी वाघुळदेने इकडं गोळीबार सुरू असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर तिने घाईत फोन कट केला.
advertisement
तुषार वाघुळदे यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व पर्यटकांना इंडियन सैन्य दलाने सुरक्षित कवच देत सुरक्षित जागी हलवले. रात्री त्यांनी मुक्काम केला असून आता ते आज कटरा येथे माता वैष्णो देवीचे दर्शन घेणार आहे. ती स्वतः कौन्सिलर आहे. त्यामुळे तिने या घटनेनंतर इतर पर्यटकांनाही धीर दिला.
जवानांनी संरक्षण दिले....
अचानक गोळीबार सुरू झाल्यामुळे सैन्य दलाने तिथे अचानक धाव घेतली. त्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले. किशोरी यांनी पती तुषार यांना सांगितले की, या सर्व पर्यटकांना आर्मीच्या वाहनामागे लपवले. थोड्या वेळानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यावर सर्वांना सुरक्षित जागी हलवले. आज ते कटराला वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आपला प्रवास पुन्हा सुरू करणार आहेत, अशी माहिती पहेलगाम येथे अडकलेल्या पर्यटक यांचे पती तुषार वाघुळदे यांनी दिली.
