Pahalgam Terror Attack बाबत मोठी अपडेट, पाकमधून कमांड, 26/11 पेक्षाही खतरनाक प्लानिंग

Last Updated:

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून कमांड मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
,प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून कमांड मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे नेतृत्व स्वत: पाकिस्तानी दहशतवाद्याने केले असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक जखमी असल्याचे वृत्त आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्याने केले होते. या हल्ल्यात जवळपास 6 दहशतवादी सहभागी होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या. दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग, पुलवामा आणि शोपियान भागात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.

दहशतवाद्यांकडून रेकी?

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे तथ्य समोर आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व पाकिस्तानी दहशतवादी स्वतः करत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांमध्ये किमान एका परदेशी दहशतवाद्याचाही समावेश होता. दहशतवाद्यांची संख्या सुमारे अर्धा डझन होती. हे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांसह एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आधुनिक उपकरणे देखील सज्ज असल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांनी कदाचित या भागाची रेकीही केली असेल.
advertisement

दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून सूचना?

आतापर्यंतच्या तपासादरम्यान, हे देखील समोर आले आहे की दहशतवाद्यांना माहिती होती की या भागात पोलिस आणि सुरक्षा दलांची उपस्थिती खूपच कमी आहे. हा परिसर पर्यटकांनी भरलेला आहे. आजपर्यंत येथे इतकी मोठी दहशतवादी घटना घडली नव्हती. दहशतवाद्यांना रेकी करण्यात काही स्थानिकांचा हात असावा, असा संशयही व्यक्त केला जात आहे. या गटाचे नेतृत्व करणारा दहशतवादी काही काळापूर्वी पाकिस्तानातून भारतात आल्याचेही उघड झाले आहे. हा पाकिस्तानी दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या त्याच्या बॉसच्या सतत संपर्कात होता आणि तेथून सतत मार्गदर्शन घेत होता.
advertisement

सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू...

गुप्तचर संस्थेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांबद्दल अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत, ज्याच्या आधारे दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. या छाप्यात कोकर नाग, पुलवामा आणि शोपियांन जिल्ह्यातील काही भागांचाही समावेश आहे. लवकरच गुप्तचर आणि सुरक्षा संस्था या प्रकरणातील हल्लेखोरांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Pahalgam Terror Attack बाबत मोठी अपडेट, पाकमधून कमांड, 26/11 पेक्षाही खतरनाक प्लानिंग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement