घटनास्थळावर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तसेच अग्निशमन दल आणि बमआयुध तज्ञ पोहोचले आहेत. अद्याप स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही; तपास सुरू आहे. (Delhi explosion news)
हा स्फोट अंगावर काटा आणणारा होता असं प्रत्यक्ष दर्शींचं म्हणणं आहे. या घटनेमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की आजचा वार, तो म्हणजे सोमवार.
advertisement
सामान्यत: लाल किल्ला परिसरातील मेट्रोस्थानक गर्दीने भरलेला असतो, विशेषतः रविवारी ते शनिवार इथे गर्दी असते. या दिवसात जास्त पर्यटक, कुटुंबं, मुलं संध्याकाळी फिरायला येतात. पण आज सोमवार आहे, आणि सोमवारी लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद असतो. त्यामुळे परिसरातील पर्यटकांची गर्दी कमी होती. शिवाय सगळं बंद असल्यामुळे त्या भागातील थेलेवाले, स्ट्रीट स्टॉल विक्रेते देखील तिथे नव्हते, त्यामुळे या स्फोटामुळे उद्भवणारी मोठी मानवी हानी काही प्रमाणात टळली आहे.
शिवाय, सोमवार असल्यामुळे लाल किल्ला इतर दिवस प्रमाणे खुला किंवा गर्दीचा नसावा, त्यातून “मोठा अनर्थ टळला” असा निष्कर्ष करता येऊ शकतो. त्यामुळेच “शुक्र हौ सोमवार होता” हा म्हणणं आजच्या परिस्थितीत वास्तवदर्शी दिसते. (Red Fort blast)
गर्दी कमी होती आणि परिणाम कमी:
लाल किल्ल्या परिसरात हा प्रकार घडला ते स्थान म्हणजे राजधानीतील अत्यंत महत्त्वाचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण आहे. त्या ठिकाणी जर मोठी गर्दी असती, म्हणजे कुटुंबांसह फिरायला आलेली लोकसंख्या तर स्फोटाचा परिणाम मानवी हानी आणि नुकसान खूप मोठं असतं. पण आजच्या परिस्थितीत गर्दी कमी असल्यामुळे, संकटाची तीव्रता कमी राहिली असावी.
आतापर्यंत अधिकृतरित्या मृतांचा आकडा निश्चित झालेला नाही. पण तुम्ही अंदाजा लावू शकता की इतर दिवशी ही घटना घडली असती तर मात्र याची तीव्रता किती जास्त असती आणि या घटनेची भीषणता आणखी किती वाढली असती.
पोलिसांनी घटनास्थळ सुमारे गेट 1 वरून बंद केले आहे आणि वाहन, परिसरातील प्रवाशांची वाहतूक विस्थापित करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशन आणि परिसरातील सुरक्षा तपासणी इतर वेळेपेक्षा वाढवण्यात आली आहे. स्फोटासाठी वापरलेले वाहन, त्याची परवानगी, स्फोट साहित्य व कारण यांची तपासणी सुरू आहे. नागरिकांकरिता सूचना: या परिसरात सध्या दूर राहावे, गर्दी किंवा अनियमित हालचाली दिसल्यास त्वरित स्थानिक पोलीस किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवावे.
