TRENDING:

खतरनाक फॅन! त्याने 1200 किलोमीटर सायकल चालवून 'या' सेलिब्रिटीला भेटायला थेट गाठली मुंबई!

Last Updated:

इतकी वर्ष वाट पाहून एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटणं हा क्षण त्याच्यासाठी भावूक करणारा होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवींद्र कुमार, प्रतिनिधी
त्याच्या सायकल प्रवासाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
त्याच्या सायकल प्रवासाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
advertisement

झुंझुनू, 16 ऑगस्ट : आतापर्यंत आपण क्रेझी फॅनच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी फॅन्स काहीही करू शकतात हे आपण पाहिलं आहे. जसं की, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांसारख्या सुपरस्टार्सचे चाहते जगभरात आहेत. ते केवळ त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुंबईत दाखल होतात. अशाच प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या एका क्रेझी फॅनची सध्या तुफान चर्चा आहे.

advertisement

राजस्थानच्या झुंझुनू भागाजवळील बिबासरचा रहिवासी असलेला हा चाहता मागील 10 वर्षांपासून गिटार वाजवतो. राकेश कुमार असं त्याचं नाव. त्याला संगीताची प्रचंड आवड आहे. त्याच्या घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नाही मात्र राकेशने लहानपणी एकदा कुमार सानू यांचं गाणं ऐकलं आणि त्याच्यात गायनाची आवड निर्माण झाली. त्याने गिटार शिकण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी तो गिटारचे कार्यक्रम सादर करतो. त्याचं एक गाणंही प्रदर्शित झालं आहे. ज्यांच्यामुळे तो संगीताशी जोडला गेला त्या कुमार सानू यांना भेटण्याची त्याच्या मनात दृढ इच्छा होती. त्यासाठी त्याने एक हटके आयडिया शोधली. त्याने झुंझुनूहून सायकलने 1200 किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठली. त्याच्या या सायकल प्रवासाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

advertisement

https://youtu.be/0WLoTo8z7w8

राकेश कुमारने सांगितलं की, 'सर्वच चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना भेटतात, मात्र मला काहीतरी खास करायचं होतं. मी यापूर्वी सायकलने एवढा मोठा प्रवास कधी केला नव्हता पण कुमार सानू यांना भेटण्यासाठी मी सायकलने मुंबईला यायचं ठरवलं.' विशेष म्हणजे राकेशच्या भेटीनंतर 4 दिवसांनी कुमार सानू यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. आपला एक चाहता आपल्याला भेटण्यासाठी एवढ्या लांबून सायकलवरून आला ही आयडिया त्यांना फार आवडली.

advertisement

यंदा 2 दिवस साजरा होणार रक्षाबंधन? नक्की 30 की 31? जाणून घ्या मुहूर्त

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

दरम्यान, राकेशने मुंबईला येण्यापूर्वी कुमार सानू यांच्या टीमशी संपर्क साधला होता. त्यांच्याशी बोलून त्याने कुमार सानू यांच्या भेटीसाठी वेळ घेतली होती. इतकी वर्ष वाट पाहून एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटणं हा क्षण राकेशसाठी भावूक करणारा होता. कुमार सानू यांची भेट होताच त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. त्यावेळी कुमार सानू यांनी त्याला शांत केलं आणि त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.

advertisement

मराठी बातम्या/देश/
खतरनाक फॅन! त्याने 1200 किलोमीटर सायकल चालवून 'या' सेलिब्रिटीला भेटायला थेट गाठली मुंबई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल