भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांच्या मुद्यांवर कठोर भूमिका घेत त्यांना शेल्टर होममध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर श्वान प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. सुप्रीम कोर्टाने आज निकाल सुनावताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र खाद्यपदार्थ बनवा. कुत्रे दत्तक घेण्यासाठी दिल्ली महापालिकेकडे अर्ज करण्यास सांगितले.
advertisement
भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आजारी आणि चावणाऱ्या कुत्र्यांना सोडले जाणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याच वेळी, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सर्व राज्यांना आदेश जारी केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 11ऑगस्ट रोजी अनेक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) च्या अधिकाऱ्यांना सर्व भागातील भटक्या कुत्र्यांना "शक्य तितक्या लवकर" पकडून 'डॉग शेल्टर'मध्ये पाठवण्याचा आदेश समाविष्ट होता.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, मोठ्या संख्येने श्वानप्रेमी गटांनी त्याविरुद्ध निषेध केला. या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली. 14 ऑगस्ट रोजी श्वानप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केल्यानंतर, न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एनव्ही अंजारिया यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.