गोड्डा : फक्त शहरच नाही तर आता गावातील महिलाही आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. शहरात महिला कार चालवताना तुम्ही पाहिले असेल. मात्र, आता गावातील महिलांनीही ट्रॅक्टरचं स्टेअरिंग सांभाळले आहे. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
अंशु देवी असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी चूल आणि मूल इतकंच मर्यादित न राहता आता स्वत: शेतात ट्रॅक्टरचे स्टेअरिंग सांभाळले आहे. त्या गोड्डाच्या मेहरमा येथील आहे. त्या आज संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श बनल्या आहेत. राज्य सरकारच्या JSLPS या योजनेंतर्गत महिला गटात सहभागी झाल्यानंतर अंशू यांना व्याजदरावर मिनी ट्रॅक्टर देण्यात आला. यानंतर अंशू या आता पुरुषांप्रमाणे स्वतः शेती करतात आणि ट्रॅक्टरही चालवतात आणि समाजात सन्मानाने वावरत आहेत. त्यांच्या ग्रुपने त्यांना हा ट्रॅक्टर दिला आहे.
advertisement
ही आहे भारतातील सर्वात महागडी टॉफी, फक्त 3 महिने उपलब्ध, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित
लोकांनी टोमणे मारले, पण.. -
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, त्या आता JSLPS सोबत जोडल्या गेल्यानंतर त्या आत्मनिर्भर बनल्या आहेत. त्यांना स्वत:चा व्यवसाय करण्याआधी आधी ऋण दिले गेले. समूहाने त्यांना मिनी ट्रॅक्टर दिले. JSLPS च्या माध्यमातून त्यांनी रांचीमध्ये ट्रॅक्टर चालवणे शिकले. सुरुवातीचे काही दिवस समाजातील लोक काही ना काही बोलत राहिले. टोमणे मारत राहिले. पण, त्यांना त्यांच्या पतीचा पाठिंबा दिला.
Photos : श्वानासाठी बनवला तब्बल 7 लाखांचा काचेचा महाल, सुविधा अशा की वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
त्या आता समाजात सन्मानाने आयुष्य जगत आहे. त्यांना पाहून गावातील इतर महिलाही शेती करत आहेत. त्या कमी पैशांत शेतात ट्रॅक्टरने लोकांच्या शेतात नांगरणीचे काम करुन देत आहेत.