Photos : श्वानासाठी बनवला तब्बल 7 लाखांचा काचेचा महाल, सुविधा अशा की वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आतापर्यंत तुम्ही अनेक प्राणीप्रेमी व्यक्तिमत्त्वांबाबत ऐकलं असेल, जे प्राण्यांच्या वाढदिवसाला विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यांच्यासाठी घरात व्यवस्था करतात. मात्र, एक व्यक्ती असा आहे, ज्याच्याबाबत तुम्ही वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य होईल.
advertisement
डॉ. शमीम अहमद हे उत्तरप्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी काही वर्षांपूर्वी ॲलेक्सची सुटका केली होती आणि तेव्हा त्याच्यासाठी झोपडी बांधली होती. यात श्वानासाठी अनेक सुविधा आहेत. पण वाढती उष्णता पाहून डॉ. शमीम अहमद यांनी आता ॲलेक्ससाठी काचेचा महाल बांधला आहे. त्याला ॲलेक्स रिसॉर्ट असे नाव देण्यात आले आहे. हे घर तयार करण्यासाठी सात लाखांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत, असे ते म्हणाले.
advertisement
advertisement
डॉ. शमीम अहमद सांगतात की, जगात सर्वात मोठा धर्म आहे मानवता. यासाठी ते या प्राण्यासाठी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आपल्या सॅलरीतील पैसे खर्च करतात. ॲलेक्सच्या कुटुंबात मांजर, ससा, मासे, बदक, पक्षी इत्यादीही या घरात राहतात. ते रस्त्यावरील कुत्रे आणि गायींच्या भोजनाची व्यवस्था करतात. अलेक्ससाठी बांधलेल्या काचेच्या महालात तुम्हाला एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला 786 अशाप्रकारे सर्वधर्म समभावाची झलक पाहायला मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement