अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव जैकी गेही (वय 31) असून ते चकरभाटा भागातील कापड व्यापारी होते. त्याचा मित्राने – आकाश चंदानी – इनोवा चालवत होता. त्याच्यासोबत पंकज छाबडा पुढील सीटवर तर जैकी मागच्या सीटवर होते. रात्री 1.30 च्या सुमारास गाडी रायपूरकडे निघाली असताना आकाशने अचानक गुटखा थुंकण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडी डिव्हायडरवर आदळून अनेक वेळा उलटली.
advertisement
सूर्याने IPLच्या पराभवाचा राग ठाण्यावर काढला, धू धू धुतले; 27 चेंडूत धावांचा...
अपघातात तिघेही गाडीतून बाहेर फेकले गेले. जैकी गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावले. त्यांच्या छाती, डोक्याला आणि खांद्याला जबर मार लागला होता. आकाश व पंकजही गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही इनोवा गाडी केवळ पलटलीच नाही तर एक उभी असलेली व्यावसायिक गाडी आणि नंतर अर्टिगा कारवर आदळली. या अपघातात अर्टिगाचा चालकही जखमी झाला. आपत्कालीन सेवा पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील केला व जखमींना रुग्णालयात हलवले.