नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश कुमार यांनी केजरीवाल यांचा मोठा पराभव केला. निवडणुकीच्या आधी केजरीवाल यांनी असा दावा केला होता की, भाजप त्यांचा पराभव करू शकत नाही. पण परवेश कुमार यांनी थेट त्यांनाच धक्का दिला. सोशल मीडियावर सध्या परवेश कुमार यांच्या नावाची चर्चा आहे.
दिल्लीतल्या लाजिरवाण्या पराभवातही काँग्रेस आनंदी; समजून घ्या राजकीय अर्थ
advertisement
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र असलेल्या परवेश यांचा जन्म १९७७ साली झाला. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते योगेंद्र शास्त्री यांचा पराभव केला होता. मे २०१४ साली १६व्या लोकसभेवर निवडूण आले. त्यांनी संसदेच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून काम देखील केले आहे. २०१९ साली ते पुन्हा पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झाले.
स्वबळाचा बार ठरला फुसका!दिल्लीत राष्ट्रवादीला मिळाली बोटावर मोजता येतील इतके मते
आता केजरीवालांचा पराभव केल्यानंतर भाजपमधील वर्मा यांची उंची वाढली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव येत आहे. अर्थात या पदासाठी बांसुरी स्वराज, मनोज वाजपेयी, रमेश बिधुडी अशी नावे देखील आघाडीवर आहेत. आजच्या विजयानंतर पर्मा यांनी सर्वात आधी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
प्रेमानंद महाराजांवर मथुरेतील लोक नाराज; अनुयायी आणि लोकांमध्ये झाली बाचाबाची
वर्मा हे त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत राहिले आहेत. २०१९ साली CAA कायद्यावर त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले होते. २०२२ साली त्यांनी एका विशिष्ट समूदायावर व्यापारी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. ज्यावर मोठा वाद झाला होता. २०२३ साली छठ पुजेच्या वेळी एका सरकारी अधिकाऱ्यासोबत वाद झाला होता. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी फेसबुक 'जय श्री राम' अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यांची एकूण संपत्ती १०.७२ कोटी इतकी आहे.