ही घटना एका रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्ब्यात घडली आहे. या डब्ब्यात टीसी चढला होता. टीसी येताच त्याने झटपट तिकीट तपासणीला सूरूवात केली. या दरम्यान टीसीने दोन महिलांना तिकीट विचारलं पण तिकीट दाखवण्याऐवजी या महिलांनी थेट टीसीसोबत हुज्जत घालायला सूरूवात केली.
एक महिला आपल्या मुलीसोबत होती यावेळी तिने टीसीला उलट उत्तर द्यायला सूरूवात केली होती. त्यामुळे टीसीने मोबाईलचा कॅमेरा ऑन करून व्हिडिओ रेकॉर्डीग करायला सुरूवात केली. पण या व्हिडिओ रेकॉर्डिगवर महिलांनी आक्षेप घेतला होता.यावेळी त्या म्हणाल्या तुम्ही तुमचं काम करा पण माझा व्हिडिओ काढू नका, असे त्या म्हणाल्या. पुढे त्या चिडून म्हणाल्या कसला फोटो हवा आहे?सेल्फी काढणार का? यावेळी महिलेची मुलगी तिच्याजवळ येऊन तिने सेल्फी द्यायला सूरूवात केली. एकप्रकारे या महिलांनी टीसीची काम करत असताना खिल्ली उडवली. पुढे याहून भयंकर घडलं.
महिला पुढे दावा करते तिचा संपूर्ण परिवार रेल्वेत आहे, तिचा भाऊ लोको पायलट आहे आणि ती फक्त वॉशरूमसाठी आली होती.यावर टीसी म्हणाला, जनरल डब्ब्यात जायचं असेल तर तिकीट घ्यावं लागतं आणि तुमच्याकडे तिकीट नाही. यानंतर महिलेने टीसीला त्याचं नाव विचारून घेतलं आणि त्यांच्या नावावरून जातीवाचक टीका केली.तुम्ही दुसऱ्या जातीचे असते तर असा गोंधळ घातला नसता,यावर टीसीने महिलेच्या बोलण्यावर आक्षेप घेतला.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिला प्रवाशावर कारवाईची मागणी जोर धरते आहे.