मृत्यूशी झुंज अन् मायेचा पदर
पहाटे ४ च्या सुमारास बलदेव परिसरात 8 बसची जोरदार धडक झाली. स्फोटचा आवाज आला धूर निघाला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. आग बघता बघता इतर गाड्यांमध्येही पसरली. या डबल डेकर बसमधून पार्वती आपली मुलगी प्राची १२ वर्षांची आणि सनी मुलगा८ वर्षांचा यांच्यासह पतीकडे नोएडाला जात होत्या. आग लागताच प्रवाशांची पळापळ सुरू झाली. आग लागल्याने सगळं संपलं असं वाटत असताना पार्वती यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, डोक्याने बसच्या खिडकीची काच फोडली. काचेचे तुकडे त्यांच्या मानेत घुसले, रक्त वाहू लागलं, पण आई शांत बसली नाही. त्यांनी आधी प्राचीला खिडकीतून सुरक्षित बाहेर काढलं आणि मग सनीला. मुलांचे प्राण वाचले, पण दुर्दैवाने पार्वती स्वतः मात्र त्या जळत्या बसमध्ये अडकल्या.
advertisement
डोळ्यांत आसवं अन् शोध सुरूच...
पार्वती यांचे पती गोविंद हे नोएडामध्ये राजमिस्त्रीचे काम करतात. पत्नी आणि मुलांच्या अपघाताची बातमी मिळताच ते मथुरामध्ये पोहोचले. जिल्हा रुग्णालय, वृंदावन रुग्णालय आणि अगदी शवविच्छेदन गृहातही ते आपल्या लाडक्या पत्नीचा शोध घेत आहेत. "पार्वती कुठे आहे? जिवंत असेल तर कोणत्या परिस्थितीत आहे? आणि जर नसेल... तर तिचं शरीर कुठे आहे?" हे प्रश्न विचारताना गोविंद यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत.
मुलांच्या जखमा आणि आईची आठवण
सोमवारी संध्याकाळी पार्वती आपल्या दोन्ही मुलांसह बसमध्ये बसल्या होत्या. अपघातानंतर मुले कशीबशी दुसऱ्या बसने घरी पोहोचली. मुलगी प्राचीच्या कमरेला गंभीर इजा झाली आहे, तर चिमुकल्या सनीच्या डोक्याला मार लागला आहे. पण या जखमांपेक्षाही आईला जळत्या बसमध्ये अडकलेलं बघून मुलं जास्त बिथरली आहेत. पार्वती यांचा मोबाईल फोन तेव्हापासून बंद येत आहे.
