TRENDING:

नांदेडमध्ये युवकांना सांगितले, स्वत: जवळ शस्त्र ठेवा; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूच्या वडिलांचे वादग्रस्त वक्तव्य

Last Updated:

Yograj Singh: भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंग पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नांदेडमधील कार्यक्रमात त्यांनी खलिस्तान समर्थक जरनल सिंग भिंद्रनवाले यांना ‘संत’ म्हणत लोकांना शस्त्रविद्या शिकण्याचं आणि शस्त्र बाळगण्याचं आवाहन केल्याने राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नांदेड: भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ते खलिस्तान समर्थक जरनल सिंग भिंद्रनवाले यालासंतम्हणताना दिसत आहेत.

advertisement

या व्हिडिओमध्ये योगराज सिंग लोकांना संबोधित करताना म्हणतात की, शस्त्रविद्या शिका आणि आपल्या जवळ शस्त्र ठेवा, कारण पुढचा काळ कठीण असणार आहे. त्यांनी उपस्थितांना गुरबाणीचा पाठ सुरू करण्याचे आवाहनही केले आणि म्हटले की, हीच गोष्ट आपल्याला पुढे कामी येणार आहे.

advertisement

हा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला असून, तो महाराष्ट्रातील श्री हजूर साहिब नांदेड येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये योगराज सिंग ‘संगत’ म्हणजेच धार्मिक जमावाला संबोधित करताना दिसतात. भाषणानंतर संगतीकडून त्यांचा पटका (धार्मिक वस्त्र) घालून सत्कारही करण्यात आला आहे. या व्हिडिओची सत्यता news18marathi.comने तपासलेली नाही.

advertisement

advertisement

योगराज सिंग म्हणतात, माझी एवढी लायकी नाही की मी काही सांगू शकू. इतके मोठे महापुरुष इथे उपस्थित आहेत की मला त्यांच्यात गुरु गोबिंद सिंह दिसतात. तरी मी एक गोष्ट सांगू इच्छितो जर परवानगी असेल तर. ते पुढे म्हणाले, मी मातांना आणि मुलींना सांगू इच्छितो की गुरु गोबिंद सिंह यांच्या काळात शहीद सिंह महाराजांना म्हणाले की- आम्हीही पंथाची सेवा करू इच्छितो. तेव्हा महाराज म्हणाले की मी असा गर्भ कुठून आणू ज्यातून तुमचा जन्म देऊ? जर मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा.

मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. संत जरनल सिंग भिंद्रनवाले यांच्याकडे एकदा एक कुटुंब आले आणि विचारलं महाराज काय आदेश आहे? संतजी म्हणाले तुमच्याकडे शस्त्र आहेत का? त्यांनी उत्तर दिलं नाही, आमच्याकडे काहीही नाही. आमच्या घरात सात लोक आहेत, तीन माता, बहिणी, वृद्ध आणि मी स्वतः, ते पुढे म्हणाले- काळ खूप भयानक आहे, तुमच्याकडे शस्त्र ठेवा. आपल्या मुलांना शस्त्र, बाणी आणि विद्या द्या. हा काळ संकटांचा आहे.

जरनल सिंग भिंद्रनवाले हा खलिस्तान समर्थक आणि दमदमी टकसालचा प्रमुख होता. त्याने सिख धर्माच्या नावाखाली कट्टर विचारधारेचा प्रसार सुरू केला आणि पंजाबमधील अनेक सिख त्याच्या विचारसरणीशी जोडले गेले. त्याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरातील अकाल तख्त हा आपला मुख्यालय बनवला. त्याच्या कट्टर कृतींमुळे 1980च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवादाची लाट उसळली होती. ज्यामुळे ऑपरेशन ब्ल्यू स्टार सारखी मोठी लष्करी कारवाई करावी लागली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
नांदेडमध्ये युवकांना सांगितले, स्वत: जवळ शस्त्र ठेवा; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूच्या वडिलांचे वादग्रस्त वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल