अशी आहे तालुकानिहाय शिक्षकांची यादी
आजरा-20, भुदरगड-23, चंदगड-12, गडहिंग्लज-25, गगनबावडा-7, हातकलंगले-40, कागल-24, करवीर-61, पन्हाळा-24, राधानगरी-39, शाहूवाडी-20 आणि शिरोळ 61 अशी तालुकानिहास लाभ घेतलेल्या शिक्षकांची संख्या आहे. राज्य शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणानुसार विशेष संवर्ग भाग एकनुसार 1 ते 12 अशा विविध कारणांमध्ये शिक्षकांना बदली करून घेता येते. त्यापैकी 12 शारीरिक आजारांपैकी व्याधीग्रस्त आणि दिव्यांग शिक्षक या विशेष तरतुदीचा लाभ घेतात.
advertisement
बदली प्रक्रियेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
मात्र, बनावट वैद्यकिय प्रमाणात सादर करून अनेक शिक्षकांनी याचा लाभ घेतला आहे, अशा तक्रारी जिल्हा परिषदेला मिळालेल्या होत्या. यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी 356 शिक्षकांच्या वैद्यकिय प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी
यासाठी कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे याचा सखोल तपास करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. या अहवालानंतर संबंधित शिक्षक लाभासाठी पात्र आहेत की नाहीत हे कळणार आहे. जर यात अपात्र शिक्षकांवर शासकीय नियमांनुसार कडक कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा : Kolhapur News: वाहतूक कोंडीत कोल्हापूरकरांचा 'श्वास' गुदमरतोय; उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष देतील का?
