यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. काही एक्झिट पोलनुसार, राज्यात त्रिशंकू परिस्थिती राहण्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात लहान घटक पक्ष आणि बंडखोरांचे महत्त्व वाढणार आहे. त्याआधीच त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. एक्झिट पोलनंतर भाजपकडून विजयाची क्षमता असलेल्या अपक्ष आमदारांसोबत संपर्काची रणनीति आखण्यास सुरुवात केली.
advertisement
विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर आता भाजप ॲक्शन मोडवर आले आहे. जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार आहेत. त्याशिवाय विजयी झालेल्या भाजप बंडखोरांवर पक्षाने केलेली कारवाई पक्ष मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय. त्या विभागातील वरिष्ठ नेत्यांवर विजयाची क्षमता असलेल्या अपक्ष आमदारांसोबत संपर्काची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजप कोणाला संपर्क साधणार?
एक्झिट पोलमध्ये महायुतीला सत्ता स्थापनेसाठी काही आमदारांची गरज भासू शकते. त्यामुळे आतापासून भाजपच्या नेत्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बच्चू कडू, उमरेडचे अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे, यासह इतरांशी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून संपर्क केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
