नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला येथील मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका गाडीत मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार किमान 3 गाड्यांना आग लागली आहे. या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
advertisement
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. जणू काही जमीन हादरली. माझ्या हातात चहाचा कप होता. लोकांची धावपळ सुरू झाली. स्फोटामुळे लोक उडून पडले. जे माझ्या पायाजवळ येऊन पडले. ज्या गाडीत स्फोट झाला त्याच्या आजूबाजूच्या 3 गाड्यांना आग लागली. हा स्फोट नेमका कशाचा आहे हे अद्याप समजले नाही.
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटानंतर मोठा आवाज झाला आणि एकाचा तुटलेला हात माझ्या समोर येऊन पडला.
या स्फोटानंतर संपूर्ण दिल्ली परिसरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. इतक नाही तर मुंबईत देखील हाय अलर्ट दिला आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की मी 3 वेळा पडलो. जणून काही मृत्यू समोर आला होता असे या परिसरात स्टॉल असलेल्या एका व्यक्तीने सांंगितले.
