महायुतीची बैठक
शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी माजी आमदार अशोक जांभळे, राष्ट्रवादीच्या सुहास जांभळे आणि अमित गाताडे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याचाही निर्णय घेण्यात आला. ते जो निर्णय घेतील, त्यासोबत राहण्याचे ठरवण्यात आले.
advertisement
तिरंगी लढतीची शक्यता
भाजपचे आमदार राहुल आवडे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या सभेत 'स्वबळाचा' नारा दिला आहे. त्यामुळे, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रित येतात की भाजप स्वबळावर लढते यावर निवडणुकीचे स्वरूप अवलंबून असेल. दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही प्रभागात कोणाचे प्राबल्य आहे, त्यानुसार जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यास सुरुवात केली आहे.
इतर घडामोडी
चोपडे गट बाजूला : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातही अंतर्गत गटबाजी असून, माजी सभापती विठ्ठल चोपडे यांचा गट सध्या बाजूला आहे. निवडणुकीत त्यांचा गट कोणती भूमिका घेतो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
जुना माने गट पुन्हा एकत्र? : इचलकरंजीच्या राजकारणात एकेकाळी खासदार माने गट आघाडीवर होता. आता हा जुना गट पुन्हा एकत्र येऊन महापालिका निवडणुकीत सक्रिय होण्याच्या चर्चा सुरू आहेत.
या सर्व घडामोडींमुळे इचलकरंजीची निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : Shiv Sena Clash : BMC निवडणुकीआधीच वातावरण तापलं, प्रभादेवीत ठाकरे-शिंदे गटात राडा
हे ही वाचा : कास पठार पाहण्यासाठी निघालात? वाहतूक मार्गात केलाय 'हा' महत्त्वाचा बदल, जाणून घ्या नवीन मार्ग