TRENDING:

भारत जपानकडून खरेदी करणार E5 सीरिज बुलेट ट्रेन, पाहा किती आहे किंमत?

Last Updated:

या सध्या जपानच्या ईस्ट जपान रेल्वे कंपनीद्वारे (जेआर ईस्ट) चालवल्या जातात, यांचा वेग ताशी 320 किमी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतात 2027 मध्ये अहमदाबाद-मुंबईदरम्यान पहिली हाय स्पीड बुलेट ट्रेन धावणार आहे. अशातच भारत जपानमध्ये निर्मित E5 सीरिजच्या शिंकानसेन बुलेट ट्रेन खरेदी करणार असल्याचं म्हटलं जातंय. तर या ट्रेन्सबद्दल सगळी माहिती जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

भारत अशा 24 E5 सीरिज बुलेट ट्रेन सेट खरेदीला अंतिम रूप देणार असून त्यासाठी 11,000 कोटी रुपये मोजणार आहे. ही बुलेट ट्रेन कशी असेल, तिचा वेग काय असेल, किती डबे असतील. या E5 सीरिज ट्रेन्सची खासियत काय? जे जाणून घेऊयात. E5 सीरिज शिंकानसेन बुलेट ट्रेन या नवीन पिढीच्या जपानी हायस्पीड ट्रेन आहेत, ज्यांना हायाबुसा म्हणतात. मार्च 2011 मध्ये जपानमध्ये या ट्रेन्सचा कमर्शियल वापर करण्यात आला. हिताची आणि कावासाकी हेवी इंडस्ट्रीज तिचे उत्पादक आहेत. या सध्या जपानच्या ईस्ट जपान रेल्वे कंपनीद्वारे (जेआर ईस्ट) चालवल्या जातात, यांचा वेग ताशी 320 किमी आहे.

advertisement

शिंकानसेन बुलेट ट्रेन मार्च 2011 मध्ये सुरू झाल्यापासून आजवर तिचा कोणताही मोठा अपघात झालेला नाही. ही सुरक्षा व आरामाचे प्रतीक मानली जाते. या ट्रेनच्या इंजिनला एक लांब नाक आहे जे समोरच्या दिशेने 15 मीटर पसरते. या ट्रेनमध्ये खूप कमी आवाज होतो. E5 सीरिज शिंकानसेन बुलेट ट्रेनमध्ये ग्रॅनक्लास सिटिंगमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी-अनुकूल सुविधा आहेत.

advertisement

चाचणीदरम्यान ही ट्रेन ताशी 400 किमी वेगाने धावू शकत होती, पण 2012 पासून, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा कमाल वेग ताशी 320 किमी ठरवण्यात आला. कदाचित ती भारतातही याच स्पीडने धावेल. नवीन पिढीच्या E5 सीरिज गाड्या आधीपेक्षा अधिक आरामदायी आणि वेगवान डिझाईन करण्यात आल्या आहेत.

ट्रेनचे लांब नाक 'टनेल बूम' रोखते, यामुळे वेगाने ट्रेन बोगद्यात जाते तेव्हा असमान हवेच्या दाबामुळे होणारा आवाज म्हणजेच टनेल बूम होत नाही. याच्या बोगी वायुगतिकीय आवाज कमी करतात. ट्रेन धावताना होणारा आवाज खाली लावलेली उपकरणं आणि ध्वनी शोषक सामग्रीद्वारे शोषला जातो.

advertisement

या ट्रेनच्या डिझाईनमधील दोन अतिशय महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पूर्ण सक्रिय निलंबन (एफएसए) आणि बॉडी टिल्टिंग सिस्टम होय. पूर्ण सक्रिय निलंबन हलत्या बोगीचे कंपन कमी करते. आतील भागात अस्सल लेदर सीट आणि लोकरीचे कार्पेट आहेत. प्रवाशांसाठी आरामदायक वातावरण निर्माण करण्यासाठी गडद रंगाचं लाकूड आणि धातूचे घटक वापरले गेले आहेत.

या ट्रेनमध्ये तीन ग्रॅनक्लास, ग्रीन क्लास आणि ऑर्डिनरी क्लास अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. या 10 डब्यांसह कॉन्फिगर केल्यात. यात 731 प्रवासी नेण्याची क्षमता आहे. 658 सीट्स ऑर्डिनरी क्लास, 55 सीट्स ग्रीन क्लास आणि 18 सीट्स ग्रॅन क्लासची आहेत.

advertisement

भारतात धावणारी बुलेट ट्रेन लाल आणि तपकिरी रंगाची असेल. भारतीय हवामानानुसार त्यात बदल केले जातील. भारताची पर्यावरणीय परिस्थिती जपानपेक्षा वेगळी आहे. भारतापेक्षा जपानमध्ये थंडी जास्त आहे. भारत जपानपेक्षा जास्त उष्ण आहे. त्यामुळे भारतातील बुलेट ट्रेनचं एअर कंडिशनिंग अधिक प्रभावी असेल.

हाय-स्पीड प्रवासासाठी समर्पित रेल्वे मार्ग बांधणारा जपान हा पहिला देश आहे. जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनची मॅग्लेव्ह आहे. या ट्रेनचा टॉप स्पीड 600 किलोमीटर प्रतितास आहे. मॅग्लेव्ह हे मूळचे जर्मन तंत्रज्ञान आहे, जे चीनने 2022 मध्ये सुरू केले.

या पूर्वी जगातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन फ्रान्सची युरोडू कंपाइलर टीव्हीजीव्ही होती. या ट्रेनचा कमाल स्पीड 574.8 किलोमीटर प्रतितास आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
भारत जपानकडून खरेदी करणार E5 सीरिज बुलेट ट्रेन, पाहा किती आहे किंमत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल