TRENDING:

Bhusawal News : 'तेरे जैसा यार..' भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील मित्रांचा शेवटचा Video समोर! जाण्यापूर्वीही मैत्रीची विण घट्ट

Last Updated:

Bhusawal News : भुसावळमध्ये बुधवारी रात्री गोळीबारात ठार झालेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा एक व्हिडीओ समोर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : भुसावळ शहर काल रात्री (बुधवारी) दुहेरी हत्याकांडाने हादरलं. शहरामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञाताने गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
सुनील राखुंडे आणि संतोष बारसे
सुनील राखुंडे आणि संतोष बारसे
advertisement

दोन मित्रांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घनटेपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत सुनील राखुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष बारसे यांनी तेरे जैसा यार कहा हे गीत गाऊन आपल्या घट्ट मैत्रीचा प्रत्यय दिला होता. काल या दोघांचीही हत्या झाली होती. त्यानंतर समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

भुसावळ शहर आज स्वयंघोषित बंद

भुसावळ शहरात काल झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली असून दरम्यान आज भुसावळ व्यावसायिकांनी स्वयंघोषित बंद पाळला आहे. या बंदमुळे भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत असून बाजारपेठेतील मोठी उलाढाल देखील ठप्प झाली आहे.

advertisement

वाचा - कोल्हापुरात भरदिवसा धाडसी चोरी! तब्बल 12 तोळे सोनं लंपास; कसं फोडलं घर? PHOTOS

कशी घडली घटना?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघेही कारमधून जात होते. यावेळी पाठलाग करत मारेकरी मागून आले आणि त्यांनी या दोघांवरही बंदुकीतून गोळीबार केला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर 10 ते 15 राऊंड फायर केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह रात्रीच पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात रात्री तीन वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bhusawal News : 'तेरे जैसा यार..' भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील मित्रांचा शेवटचा Video समोर! जाण्यापूर्वीही मैत्रीची विण घट्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल