सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई : विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात पार पडणार आहे. ठाकरे गटाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे हा मेळावा भव्य करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. तर, दुसरीकडे मुंबई वाहतूक पोलिसांकडून दादर-माहीममधील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.
advertisement
दसरा मेळाव्यामुळे 2 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत अनेक मार्गात बदल होणार आहे. तर काही मार्गांवर प्रवेश बंदी असणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने मुंबईत गाड्या येण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी हा बदल केला आहे. काही ठिकाणी नो पार्किंग जाहीर करण्यात आले आहे.
>> वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
> स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बँक सिग्नल)
> केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
> एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.
> पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर
> दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर
> दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर.
> एन. सी. केळकरमार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर
> एल.जे. रोड, राजा बडे जंक्शन ते गडकरी
>>> वाहनांना नो एन्ट्री असलेले मार्ग व पर्यायी मार्ग
> स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन, माहीम)
पर्यायी मार्ग - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
> राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.
पर्यायी मार्ग - एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शनवरून पुढे गोखले रोडचा वापर करतील.
> दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहिनी.
पर्यायी मार्ग - राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
> गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर
पर्यायी मार्ग - एम. बी. राऊत मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.