परतीचा पाऊस कधीपर्यंत राहणार?
हवामान शास्त्रज्ञ डाॅ. रामचंद्र साबळे सांगतात की, "बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या ढगांमुळे पावसाची पोषक स्थिती निर्माण होत आहे. हवेचा दाब हा 1002 हेप्टापास्कलपर्यंत खाली येऊन 1 सप्टेंबरपासूनच परतीच्या पावसाला सुरूवात होईल. हा पाऊस 20 ऑक्टोबरपर्यंत राहील."
अजून 2 दिवस पावसाची शक्यता कमी
सध्या हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाने उघडीप घेतली आहे, ढग कमी झाले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशही थेट मिळतो आहे. पुढे 2 दिवस पावसाची शक्यता कमी आहे, अशीही माहिती वेधशाळेकडून मिळालेली आहे. यंदाचा पाऊस जोरदार होता. 230 मिलीमीटर नोंद झाली आहे. जुन-जुलै महिन्यात पाऊस कमी पडला, परंतु ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त कोसळला. 23 ऑगस्टपर्यंत 102 टक्के पाऊस झालेला आहे.
advertisement
सद्यस्थितीचा विचार करता प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरूजवळील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 15 अशं तर इक्वेडोरजवळ 17 अंश सेल्सियश इतके कमी झाल्याने 'ला-निना'चा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.
'ला निना' आहे तरी काय?
प्रशांत महासागर अमेरिकेच्या पूर्वभागात आहे. या सागराच्या तापमानातील चढ-उतारामुळे आशिया खंडातील हवामानावर परिणाम जाणवतो. इथे हवामान थंड असेल तर पाऊस जास्त होतो, तर तापमान जास्त असेल तर दुष्काळाची शक्यता असते. सध्या प्रशांत महासागराच्या पूर्व किनाऱ्यावर पेरूजवळ 15 अंश आणि इक्वेडारजवळ 17 अंश सेल्सियस तापमान आहे. त्यामुळे इथले तापमान थंड आहे, परिणामी पाऊस लांबण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Marathwada Weather: मराठवाड्यात हवापालट, मुसळधार पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हे ही वाचा : Pune Rain: पुढील 24 तास धोक्याचे, पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजचा हवामान अंदाज