गवे झुंजू लागले अन् घाटात कोसळले
आंबा घाटातील हा परिसर घनदाट जंगलांना आणि पावसाच्या वातावरणात धुक्यांनी भरलेला असतो. येथे नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे कळकदरा येथील उजवा कडा कापण्यात आला आहे. याच्या ठिकाणी गवा रेड्यांची झुंज सुरू झाली आणि त्यांचा तोल गेली. त्यामुळे ते थेट 100 खोली कोसळले आणि महामार्गावर येऊन पडले. त्यातच त्यांच्या मृत्यू झाला.
advertisement
प्रचंड पावसांत अन् धुक्यात घडली घटना
घटनेच्या वेळी घाटात प्रचंड पाऊस सुरू होता. तसेच मोठ्या प्रमाणात धुकेदेखील पसरले होते. सकाळी 9 वाजता घाटातील कामगार कामावर आले असता, त्यांच्या वाहनासमोरच गवे येऊ कोसळले. कामागारांना जवळ जाऊन पाहिले, दोन्ही गव्यांचा जागीत मृत्यू झाला होता. त्यांनी रत्नागिरी परिक्षेत्र वनधिकारी यांना माहिती दिली आणि त्यांचा पंचनामा करण्यात आला.
हे ही वाचा : Karad News: अल्पवयीन लेकीची मिळाली साथ, बापाने सुरू केल्या घरफोड्या; पोलिसांनी कसा घेतला शोध?
हे ही वाचा : Crime: दारूच्या नशेत मित्राला दगडाने ठेचलं, लपून बसला व्यसनमुक्ती केंद्रात... पण पुढे काय घडलं?