Crime: दारूच्या नशेत मित्राला दगडाने ठेचलं, लपून बसला व्यसनमुक्ती केंद्रात... पण पुढे काय घडलं? 

Last Updated:

दारूच्या दुकानात सहज मैत्री झाली. दोघांनी दारू घेतली आणि रिकाम्या जागेत निवांत प्यायला गेले. दारू पित असताना दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर...

Crime News
Crime News
नांदेड : दारूच्या दुकानात सहज मैत्री झाली. दोघांनी दारू घेतली आणि रिकाम्या जागेत निवांत प्यायला गेले. दारू पित असताना दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर भांडणात झालं अन् एकाने दुसऱ्याच्या डोक्यात सरळ मोठा घातला. इतकंच करून तो थांबला नाही, तर त्याने आणखी एक भलामोठा दगड घेता त्याचं डोकं जीव जाईपर्यंत ठेचलं. तिथून पळ काढला आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. नेमकं प्रकरणं कसं घडलं आणि पोलिसांना कसं शोधून काढलं ते सविस्तर पाहुया...
दारूच्या दुकानात झाली मैत्री
तांदळी गावातील बाबाराव बालाजी मथे हे आपल्या कुटुंबासह तेलंगणा राज्यात कामासाठी राहत होते. 10 ऑगस्ट रोजी कुटुंबाला घेऊन ते गावी आले. 11 ऑगस्ट रोजी मुखेड बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी केला. त्यानंतर ते दारुच्या अड्ड्यावर गेले. तिथे त्यांना बालाजी वर्धमान भालेराव (वय-25. रा. कुंद्राळा) भेटला. दोघांच्या संवाद झाला, पुढे थोड्याच वेळात मैत्री झाली.
advertisement
शेतात गेले दोघे दारू प्यायला
पुढे दारू घेऊन एका पडीक शेतात दारु पिण्यासाठी गेले. दारू पित असत्ना त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद टोकाला गेला. त्यामुळे बालाजी भालेरावने सरळ दगड उचलला आणि बाबाराव मथेच्या डोक्यात घातला. त्यामुळे बाबाराव खाली पडला. याचा फायदा घेत बालाजीने भलामोठा दगड घेऊन डोकं ठेचायला सुरू केलं. त्यातच बाबारावचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बालाजी पसार झाला.
advertisement
48 तासात पोलिसांनी आरोपीला केली अटक
शेतात मृतदेह पडल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. आरोपीच्या शोधासाठी तपास पथकं रवाना झाली. शोध सुरू असताना पोलिसांना कळलं की, आरोपी उद्गीरमधील एका व्यसनमुक्ती केंद्रात लपून बसला आहे. 14 ऑगस्ट रोजी पोलिसांना उद्गीर गाठलं आणि त्याला ताब्यात घेतलं. अवघ्या 48 तासांत पोलिसांना आरोपीला पकडल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime: दारूच्या नशेत मित्राला दगडाने ठेचलं, लपून बसला व्यसनमुक्ती केंद्रात... पण पुढे काय घडलं? 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement