TRENDING:

कोचिंगची मदत नाही, तरीही दुसऱ्या प्रयत्नात झाली IAS अधिकारी, अशी आहे तरुणीची Success Story

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 03 नोव्हेंबर :  केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणारी यूपीएससी सीएसई परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यासाठी उमेदवार चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करतात. काळजीपूर्वक तयारी आणि सतत मेहनत करूनही फार कमी लोक या परीक्षेत यशस्वी होतात. परीक्षेची तयारी करणारे बरेच उमेदवार कोचिंग घेतात. पण, काही लोक स्व-अभ्यासातूनही शिकतात. गेल्या वर्षीच्या परिक्षेत सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांच्या यशोगाथांमधूनही अनेकांना प्रेरणा मिळू शकते.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

या ठिकाणी अशाच एका यशस्वी मुलीची माहिती देण्यात आली आहे. आयएएस कस्तुरी पांडा, असं या मुलीचं नाव असून, तिनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया स्तरावर 67वा रँक मिळवला आहे.

एनआयटीमधून घेतलं B.Techचं शिक्षण

आयएएस कस्तुरी पांडा मूळच्या ओडिशातील आहेत. त्यांनी 2022 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 67वा क्रमांक पटकावलेला आहे. नागरी सेवा परीक्षेत त्यांना एकूण 1006 गुण मिळाले होते. त्यापैकी 822 गुण हे लेखी परीक्षेत मिळाले होते. कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात कस्तुरी आयएएस अधिकारी पदापर्यंत पोहोचल्या आहे. कस्तुरी यांनी एनआयटी रूरकेला येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पदवी प्राप्त केलेली आहे. कस्तुरी यांचा दावा आहे की, त्यांना पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहचण्यात यश मिळालं होतं. मात्र, मुलाखतीच्या फेरीत त्या अपयशी ठरल्या. यानंतर त्यांनी आपल्यातील कमकुवत बाबींवर काम केलं, सुधारणा केल्या आणि पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या.

advertisement

सराव पेपरवर दिलं जास्त लक्ष

कस्तुरी पांडा यांच्या मते, संपूर्ण यूपीएससी अभ्यासक्रम स्मार्ट स्टडी सिस्टम वापरून कव्हर केला पाहिजे. मूलभूत गोष्टींचा अभ्यास करून यूपीएससीची तयारी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्या स्वत: अशाच पद्धतीनं अभ्यास करत होत्या. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची क्रमिक पुस्तकं त्यांनी वाचून काढली. कस्तुरी पांडा यांनी घरी राहून अनेक परीक्षांचे पेपर सोडवले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. यूपीएससी उमेदवारांनी सराव प्रश्नपत्रिकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 2020मधील प्रीलिम्स परीक्षेपूर्वी, कस्तुरी यांनी 50 ऑब्जेक्टिव्ह आणि 50 लाँग आन्सर प्रश्नपत्रिका सोडवल्याचा देण्याचा दावा केला आहे.

advertisement

2022च्या प्रयत्नादरम्यान त्यांनी केवळ तीस लाँग आन्सर पश्न पत्रिका सोडवल्या होत्या. त्यांनी मागील सराव चाचण्या देखील अपडेट केल्या. त्यांनी आपल्या दोन्ही प्रयत्नांमध्ये चांगली कामगिरी केली आणि कटऑफ पास केला. पण, 100 किंवा त्याहून अधिक गुणांसाठी 90-94 प्रश्न दोन तासांत पूर्ण करण्याचं त्यांचं लक्ष्य होतं.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
कोचिंगची मदत नाही, तरीही दुसऱ्या प्रयत्नात झाली IAS अधिकारी, अशी आहे तरुणीची Success Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल