TRENDING:

कोल्हापूरकरांनो लक्ष द्या! आजपासून 1 दिवस आड येणार पाणी; शहरातील 'या' भागात होणार टँकरने पाणी पुरवठा

Last Updated:

Kolhapur News : काळम्मावाडी पाइपलाइन योजनेतील 3 पंपापैकी एका पंपात बिघाड झाला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. पंप दुरुस्ती होईपर्यंत...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News : काळम्मावाडी पाइपलाइन योजनेतील 3 पंपापैकी एका पंपात बिघाड झाला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. पंप दुरुस्ती होईपर्यंत पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून एक दिवस आड शहरातील ए. बी वाॅर्ड, उपनगर आणि ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेडून करण्यात आले आहे. जिथे नळाद्वारे पाणी पुरवठा होणार नाही, त्या भागात टँंकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

या परिसरांत होणार एक दिवस आड येणार पाणी

या नियोजनांतर्गत पुईखडी परिसर, सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी परिसर, आपटेनगर,  राजोपाध्येनगर कणेरकरनगर, नाना पाटीलनगर, तुळजाभवानी काॅलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधीनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, आटीआय परिसर, जोगेश्वरी काॅलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, शेंडा पार्क या परिसरांमध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे.

advertisement

ई-वाॅर्डमध्ये आजपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यात राजरामुपरी पहिली ते तेरावी गल्लीपर्यंत, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूपुरी, राजेंद्रनगर, रुईकर काॅलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, लिशा हाॅटेल परिसर, महाडिक वसाहत या परिसरांचा समावेश आहे.

नागरिकांना सतावतेय पाण्याची चिंता

ऐन सुणासुदीच्या दिवसांमध्ये घरात पाणी येत नसल्याने नागरिकांना उद्याच्या पाण्याची चिंता सतावत आहे. रात्री-अपरात्री, पहाटे पाणी येत असल्यामुळे नागरिकांना जागरण करावे लागत आहे. टँकर येऊन गेली की, पुन्हा पाणी मिळणार नाही, या भीतीने नागरिक रस्तावर पाण्यासाठी उभारलेले दिसत आहेत.

advertisement

हे ही वाचा : Weather Alert: 24 तास पावसाचे, मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

हे ही वाचा : सरकारकडून कोल्हापूरकारांची फसवणूक! 'शक्तिपीठ'विरोधात पुन्हा रान पेटणार, सतेज पाटील अन् राजू शेट्टी आक्रमक

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
कोल्हापूरकरांनो लक्ष द्या! आजपासून 1 दिवस आड येणार पाणी; शहरातील 'या' भागात होणार टँकरने पाणी पुरवठा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल