सरकारकडून कोल्हापूरकारांची फसवणूक! 'शक्तिपीठ'विरोधात पुन्हा रान पेटणार, सतेज पाटील अन् राजू शेट्टी आक्रमक
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाला विरोध झाला होता, त्यावेळी राज्यसरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरपुरती अधिसुचना रद्द केली होती. त्यावेळी...
Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाला विरोध झाला होता, त्यावेळी राज्यसरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरपुरती अधिसुचना रद्द केली होती. त्यावेळी उत्साह साजरा करण्यात आला होता. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापूरातून महामार्ग करण्यात येणार, असे स्पष्टपणे अधिसुचनेत म्हटलं आहे. त्यामुळे या सरकारने कोल्हापूरकांची फसवणूक करून पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप काॅंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
महायुतीच्या नेत्यांनी दिलेला शब्द फिरवला
सतेज पाटील यांनी यांसदर्भात गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकातून सरकारवर आरोप केलेले आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे की, शक्तिपाठ महामार्गाबद्दल शासनाने नवा अध्यादेश काढला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील रेखांकनाबद्दलचा उल्लेख आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी निवडणुकीच्या आधी 'आम्ही हा महामार्ग रद्द करणार', असा शब्द दिला होता. पण आता त्यांनीही शब्द फिरवला आहे, असे अध्यादेशातून स्पष्ट होते. आदेशातील मुद्दा क्रमांक 3 मध्ये ऑक्टोबरची अधिसूचना रद्द करत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूरात शक्तिपीठ महामार्ग होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही शांत बसणार नाही. शक्तिपीठ महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन करू. सरकारला हा पैसाच खर्च करायचा असेल तर नागपूर-रत्नागिरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना 5000 कोटी द्या, असेही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
जिल्ह्यात एकही नवा मार्ग होऊ देणार नाही - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून सरकारवर निशाणा साधला आहे. शेट्टी म्हणाले की, "शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनास मान्यता देऊन सरकारने जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. तरीही आम्ही राज्यभरात शक्तिपीठीस तीव्र विरोध करणारच आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात एकही नवीन मार्गही होऊ देणार नाही", असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
advertisement
हे ही वाचा : ठाकरेंच्या घरचा पाहुणचार, 'राज की बात' काय? एकनाथ शिंदेंची शिवतीर्थाबाहेर टोलेबाजी, काही नवे लोक...
हे ही वाचा : मोठी बातमी : शक्तिपीठ महामार्गाच्या भू संपादनाचा आदेश निघाला, कोल्हापूरला वगळलं, २० हजार ७८७ कोटी मंजूर
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरकारकडून कोल्हापूरकारांची फसवणूक! 'शक्तिपीठ'विरोधात पुन्हा रान पेटणार, सतेज पाटील अन् राजू शेट्टी आक्रमक


