TRENDING:

कोण म्हणतं शेती परवडत नाही? शेतीच्या उत्पन्नावर घेतली 30 एकर जमीन, बळीराजाची यशोगाथा!

Last Updated:
Agriculture Success: आधुनिक पद्धतीनं शेती केल्यास शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू शकते. यवतमाळमधील प्रगतशील शेतकरी कृष्णराव देशट्टीवार यांनी हेच दाखवून दिलंय.
advertisement
1/9
शेती परवडत नाही? शेतीच्या उत्पन्नावर घेतली 30 एकर जमीन, एका बळीराजाची यशोगाथा!
सध्याच्या काळात शेती परवडत नाही हे अनेकांचं मत असतं. परंतु, आधुनिक पद्धतीनं शेती केल्यास चांगलं उत्पन्न घेता येतं हे काही शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. यापैकीच एक यवतमाळमधील पांढरकवडाचे शेतकरी कृष्णराव देशट्टीवर हे आहेत. आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी शेती व्यवसायात मोठे साम्राज्य उभे केले आहे.
advertisement
2/9
खैरगाव देशमुख या गावातील शिवारात कृष्णराव देशट्टीवार यांची 70 एकर वडिलोपार्जित शेती आहे. खैरगाव देशमुख येथून 10 किमी अंतरावर पांढरकवडा येथे कृष्णराव राहतात. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच शेतीमध्ये काम करायची आवड निर्माण होत गेली. वडिलांसोबत मी शेतात जाऊन काही न काही उद्योग करून बघत होतो. त्यानंतर मी 16 वर्षाचा असताना वडिलांचे निधन झाले, असं कृष्णराव सांगतात.
advertisement
3/9
आमच्याकडे 70 एकर शेती वडिलोपार्जित शेती होती. त्या संपूर्ण शेतीची जबाबदारी माझ्यावर आली. तेव्हा काका मदत करत होते. काकांच्या सहकार्यातून मी शेती सांभाळत होतो. काही वर्षांनंतर काकांची सुद्धा साथ सुटली आणि सर्व जबाबदारी माझ्यावर आली. 
advertisement
4/9
पूर्वी कापूस, तूर, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेत होतो. यातून पैसे जमवून मी 30 एकर शेती आणखी विकत घेतली. आता माझ्याकडे 100 एकर शेती आहे, पांढरकवडा या गावावरून ये - जा करत मी सद्या शेती सांभाळतो. 2009 पासून माझा कल फळबाग केंद्रित शेतीकडे वाढत गेला, असंही कृष्णराव सांगतात.
advertisement
5/9
फळबाग केंद्रित शेतीसाठी मी सर्वात आधी सिंचनावर भर दिला. तालुक्यात ठिंबक सिंचन प्रणाली उभारण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि त्यात आता यश मिळाले आहे. सध्या माझी 95 एकर शेती ही ठिंबक सिंचनाच्या आधारावर आहे. त्यानंतर जमीन सुधारणा देखील तेवढीच महत्वाची आहे. त्यावरही मी स्वतः लक्ष दिले. दरवर्षी 15 ते 20 हजार रुपयांचे शेणखत मी माझ्या शेतामध्ये वापरायला सुरुवात केली. 
advertisement
6/9
काही काळानंतर संपूर्ण शेती फळबाग केंद्रित करायची हा विचार माझ्या डोक्यात आला. याचे कारण हेच की, निसर्ग साथ देत नाही, मजूरटंचाई, पाणी, बाजारपेठेचे अंतर, जेमतेम उत्पन्न या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मी फळबाग केंद्रित शेतीकडे लक्ष घातले. आपल्याकडे असलेल्या सोयीनुसार पिकांची निवड केली. त्यात लिंबू, पेरू, केळी, कलिंगड हे फळबाग केंद्रित पिकं घ्यायला सुरवात केली. तर कापूस, तूर हे हंगामी पिकं सुद्धा मी घेत होतो, असंही त्यांनी सांगितंल.  
advertisement
7/9
लिंबू पिकाची निवड करण्याचे कारण हेच की ते वर्षभरात कमीत कमी देखभाल करून चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. लिंबू या पिकाला बिगर हंगामात 25 रुपये किलो दर आजपर्यंत मिळालाय. तर उन्हाळ्यात 60 रुपयांपर्यंत लिंबाचे दर गेलेले आहेत. पेरुचे माझ्याकडे 500 झाड आहेत. पेरूचे प्रती झाड 40 किलोचे उत्पादन मिळते. पेरुला किमान 20 रुपये प्रतीकिलो असा दर मिळतो. त्यानंतर केळीचे 1500 झाड आहेत, त्यात 28 किलो वजनाचा घडापर्यंत उत्पादन गेले आहे. 
advertisement
8/9
कलिंगडाचे उत्पादन एकरी 15 ते 28 टनपर्यंत झाले आहे. तर कापूस एकरी 15 क्विंटल पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर गहू एकरी 12 क्विंटलपर्यंत गेलेला आहे. तूर ही एकरी 8 ते 9 क्विंटलपर्यंत गेलेली आहे. त्यालाच सोबती अंजीर, फणस, आंबे, मोसंबी, नारळ याची प्रत्येकी 20 झाडांची लागवड केलेली आहे. यातूनही बऱ्यापैकी उत्पादन मिळत आहे.
advertisement
9/9
संपूर्ण शेतीची माझी वार्षिक उलाढाल ही 80 लाखांपर्यंत होतेय. 2019-20 मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून इस्राईल दौऱ्यासाठीही माझी निवड झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील इस्राईल दौऱ्यासाठी निवड झालेला मी एकमेव शेतकरी होतो, असेही कृष्णराव लोकल18 शी बोलताना सांगतात. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
कोण म्हणतं शेती परवडत नाही? शेतीच्या उत्पन्नावर घेतली 30 एकर जमीन, बळीराजाची यशोगाथा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल