अशोक कुमार यांचे जावई, कॉमेडीच्या दुनियेतील राज माणूस; सासऱ्यांसोबत दिल्यात अनेक हिट फिल्म्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ashok Kumar Son in Law : अभिनेते अशोक कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टी गाजवली. पण तुम्हाला माहिती आहे की त्यांचे जावई देखील प्रसिद्ध अभिनेते होते.
advertisement
1/11

दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदी सिनेसृष्टीला त्यांनी अनेक कल्ट फिल्म्स दिल्या आहेत.
advertisement
2/11
अशोक कुमार यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीही सिनेक्षेत्रात आलेलं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा जावई प्रसिद्ध अभिनेता आहे.
advertisement
3/11
त्यांनी अनेक विनोदी भुमिकांमध्ये काम केलं आहे. सासरे अशोक कुमार यांच्याबरोबरही त्यांनी अनेक हिट फिल्म्स केल्या आहेत.
advertisement
4/11
देवेन वर्मा असं अशोक कुमार यांच्या जावयाचं नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय आहेत.
advertisement
5/11
आपल्या खास अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. धर्मपुत्र हा त्यांचा पहिला सिनेमा होता. ज्यासाठी त्यांना 600 रुपये मानधन मिळालं होतं.
advertisement
6/11
देवेन वर्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1937 रोजी गुजरातच्या कच्छ येथे झाला. त्यानंतर त्यांची फॅमिली पुण्यात शिफ्ट झाली. त्यांनी नौरोजी वाडिया कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात सन्मान पदवी मिळवली. शिक्षण सुरू असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यावेळेस ते अनेक स्टेज शो आणि नक्कला करायचे.
advertisement
7/11
एकदा उत्तर भारत पंजाबी असोसिएशनच्या स्टेज शोमध्ये अभिनय करताना प्रसिद्ध दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांनी त्यांना पाहिलं. चोप्रां यांनी देवेनला 'धर्मपुत्र' सिनेमाची ऑफर दिली.
advertisement
8/11
'धर्मपुत्र' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. पण त्यांच्या करिअरची दार मात्र उघडली. त्यानंतर त्यांनी 'गुमराह' सिनेमात नोकराची भूमिका मिळाली. त्यांच्या त्या भुमिकेचं त्यांनी सोनं केलं. त्यांचं खूप कौतुक झालं.
advertisement
9/11
1970 च्या दशकात देवेन वर्मा यांनी विनोदाच्या दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'चोरी मेरा काम', 'चोर के घर चोर', 'अंगूर', 'गोलमाल', 'खट्टा मीठा' आणि 'रंग बिरंगी' सारख्या सुपरहिट सिनेमात त्यांनी काम केलं.
advertisement
10/11
देवेन वर्मा यांनी अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी रूपा गांगुलीशी लग्न केलं. अशोक कुमार यांच्यासोबत काम करत असताना दोघांची मैत्री झाली होती.
advertisement
11/11
देवेन वर्मा यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत 149 सिनेमात काम केलं. त्यांनी केवळ अभिनयच नव्हे तर काही चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. 2 डिसेंबर 2014 रोजी त्यांचं पुण्यात हार्टअटॅकने निधन झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अशोक कुमार यांचे जावई, कॉमेडीच्या दुनियेतील राज माणूस; सासऱ्यांसोबत दिल्यात अनेक हिट फिल्म्स