TRENDING:

Farmer Success Story: शेतात लावली 60 झाडे, 16 लाख रुपयांचं मिळालं उत्पन्न, शेतकऱ्याने कशी केली फायद्याची शेती?

Last Updated:
Ber Farming: बोरीची बाग परवडत नसल्याने सोलापूरच्या शेतकऱ्याने अर्ध्या एकर शेतीत वेगळा प्रयोग केला. आता लाखोंची कमाई होतेय.
advertisement
1/7
शेतात लावली 60 झाडे, 16 लाख रुपयांचं मिळालं उत्पन्न, कशी केली फायद्याची शेती?
सध्या शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच काहीसा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. मोहोळ तालुक्यातील वाफळे गावचे शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी चेकनेट बोरांची शेती केलीये.
advertisement
2/7
अर्ध्या एकरात त्यांनी 60 झाडे लावली असून त्यातून गेल्या 4 वर्षांत त्यांना खर्च वजा करून तब्बल 16 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/7
वाफळे येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी आपल्या अर्धा एकर शेतात उमरान आणि चमेली बोरांची लागवड केली होती. या बोरांच्या विक्रीतून खर्चही निघेना.
advertisement
4/7
त्यामुळे त्यांनी डोकं चालवलं आणि इतरांप्रमाणे बाग काढून टाकण्याऐवजी त्याच झाडांना चेकनेट बोरांचं कलम केलं. आता गेल्या चार वर्षांत त्यांना 16 लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं आहे.
advertisement
5/7
अर्ध्या एकरात जवळपास 60 चेकनेट बोरांची लागवड केली आहे. यात 18 बाय 18 वर अंतर ठेवून लागवड केली आहे. चेकनेट बोरांची लागवड करण्यापासून ते फवारणीपर्यंत अर्ध्या एकराला 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. तर चार वर्षांत 1 लाख 80 हजार रुपये बोरांच्या बागेवर खर्च झाले आहेत, असे चव्हाण सांगतात.
advertisement
6/7
चेकनेट बोर दिसायला नारंगी पिवळसर रंगाची असतात आणि खाण्यासाठी स्वादिष्ट गोड आणि लहान आकाराची असतात. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, धाराशिव, कोल्हापूर, या ठिकाणी चेकनेट बोरांना मागणी अधिक आहे. एकदा लागवड केल्यानंतर या बोरापासून शेतकरी दिगंबर चव्हाण हे गेल्या चार वर्षांपासून उत्पन्न घेत आहेत. या काळात 1 लाख 80 हजारांचा खर्च आला असून 16 लाख रुपयांचं उत्पन्न निघालं आहे, असं शेतकरी सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान, शेतकऱ्यांनी ऊस किंवा पारंपरिक पिके घेण्यापेक्षा वेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. चेकनेट बोरांची शेती केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळेल, असं मत शेतकरी दिगंबर चव्हाण सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: शेतात लावली 60 झाडे, 16 लाख रुपयांचं मिळालं उत्पन्न, शेतकऱ्याने कशी केली फायद्याची शेती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल