TRENDING:

Rohit Sharma : रोहितने धुडकावला गंभीरचा आदेश? मुंबईच्या टीममध्ये नाव नाही, समोर आलं खरं कारण!

Last Updated:
टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआय, निवड समिती तसंच टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आग्रही होते.
advertisement
1/7
रोहितने धुडकावला गंभीरचा आदेश? मुंबईच्या टीममध्ये नाव नाही, समोर आलं खरं कारण!
विराट-रोहितने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावं, अशी बीसीसीआयची इच्छा असतानाही रोहित शर्माचं नाव मुंबईच्या टीममध्ये समाविष्ट केलं गेलं नाही. रोहितशिवाय यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांचीही मुंबईच्या टीममध्ये निवड झाली नाही.
advertisement
2/7
मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्माचं नाव दिसत नसल्याचं पाहून अनेकांनी रोहितने बीसीसीआय आणि कोच गौतम गंभीरचा आदेश धुडकावला का? असा प्रश्न विचारला. यानंतर अखेर मुंबईचे निवड समिती प्रमुख संजय पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/7
'रोहित, जयस्वाल, दुबे, रहाणे किमान पहिल्या दोन सामन्यांसाठी तरी मुंबईच्या टीमचा भाग नसतील, कारण निवड समिती तरुण टीमसह पुढे जात आहे', असं संजय पाटील पीटीआयसोबत बोलताना म्हणाले.
advertisement
4/7
यशस्वी पोटाच्या दुखण्यावर उपचार घेत आहे, यातून तो लवकरच बरा होईल. आम्हाला वाटतंय की तरुण खेळाडूंना संधी दिली गेली पाहिजे. पण जेव्हा ते उपलब्ध असतील तेव्हा त्यांना टीममध्ये समाविष्ट केलं जाईल. पहिल्या दोन सामन्यांसाठी आम्ही तरुण खेळाडूंसह प्रयोग करत आहोत, असं वक्तव्य संजय पाटील यांनी केलं.
advertisement
5/7
विजय हजारे ट्रॉफी या 50 ओव्हरच्या स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. मुंबई स्पर्धेच्या ग्रुप सी मध्ये आहे, ज्यात त्यांच्यासोबत पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा आणि हिमाचल प्रदेश आहे. मुंबईचा पहिला सामना 24 डिसेंबरला सिक्कीमविरुद्ध होईल.
advertisement
6/7
दरम्यान विराट कोहली आणि ऋषभ पंत हे दोघेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळणार आहेत. दिल्लीची टीम अद्याप जाहीर झालेली नसली, तरी या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती दिल्ली क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.
advertisement
7/7
विजय हजारे ट्रॉफीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाकडून खेळतील. 3 वनडे मॅचच्या या सीरिजला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहितने धुडकावला गंभीरचा आदेश? मुंबईच्या टीममध्ये नाव नाही, समोर आलं खरं कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल