TRENDING:

Farmer Success Story: शेतकऱ्याचा मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग, मिळणार 5 लाख रुपयांचं उत्पन्न, कशी केली शेती?

Last Updated:
शेतकरी शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. तरुण शेतकरी गणेश गोलवाल यांनी देखील एक असाच प्रयोग केला आहे.
advertisement
1/7
मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग, मिळणार 5 लाख रुपयांचं उत्पन्न, कशी केली शेती?
शेतकरी शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हसनाबादवाडी येथील तरुण शेतकरी गणेश गोलवाल यांनी 9 वर्षांपूर्वी 4 एकरमध्ये मोसंबीची लागवड केली आहे.
advertisement
2/7
सध्या त्यांच्या शेतात 900 झाडे आहेत. गतवर्षी 3.60 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले होते. आता देखील जवळपास 25 टन मोसंबी निघेल आणि यातून 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असे गोलवाल यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले आहे.
advertisement
3/7
गोलवाल यांनी त्यांच्या शेतातील मोसंबीवर वाढत्या प्रादुर्भावामुळे 4 एकर क्षेत्रात बारा बाय बारा फुटावर मोसंबी या फळाची लागवड केलेली आहे. तसेच या शेतीतून मोसंबीचे चांगले उत्पादन मिळावे म्हणून ते शेणखताचा वापर करतात.
advertisement
4/7
फळाची गळती सुरू झाल्यास शेतीची मशागत कमी करायची, मशागत जास्त प्रमाणात केली तर काही प्रमाणात फळाची गळ होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फळ दर्जेदार आल्याने चांगला भाव मिळेल आणि यातून समाधानकारक उत्पन्न मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
advertisement
5/7
मोसंबी फळावर पाहिले तर जास्त प्रमाणात कोळी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या कोळी रोगापासून फळाचा बचाव करण्यासाठी कीटकनाशक तसेच बुरशीनाशक वापरावे लागते.
advertisement
6/7
नवीन शेतकऱ्यांना मोसंबी शेती करायची असल्यास सर्वप्रथम मोसंबी शेतीची संपूर्ण माहिती घ्यायची. त्याबरोबरच चांगले रोप निवडणे देखील हे गरजेचे आहे. क्षेत्रानुसार आणि पाण्याचे नियोजन करून लागवड करावी असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
7/7
गोलवाल यांच्याकडे 16 वर्षांपूर्वीचे काही झाडे आहेत, त्या झाडांची निवड करून आणि त्याचा अभ्यास करून घरीच कलम तयार करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या शेतात लागवड केलेल्या मोसंबीच्या झाडांची रोपे देखील त्यांनीच तयार केले असल्याचे सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: शेतकऱ्याचा मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग, मिळणार 5 लाख रुपयांचं उत्पन्न, कशी केली शेती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल