Best Suspense Thriller : 23 वर्षांपूर्वीची थ्रिलर फिल्म, दृश्यमपेक्षाही तगडा सस्पेन्स, क्लायमॅक्स पाहून बसेल 440 वोल्ट झटका
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Suspense Thriller : काही चित्रपट असे असतात, जे प्रेक्षकांना पूर्णपणे हादरवून सोडतात. अशीच एक २३ वर्षांपूर्वीची क्लासिक सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे, जिने सस्पेन्सची व्याख्या बदलून टाकली.
advertisement
1/7

मुंबई: काही चित्रपट असे असतात, जे प्रेक्षकांना पूर्णपणे हादरवून सोडतात. अशीच एक २३ वर्षांपूर्वीची क्लासिक सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे, जिने सस्पेन्सची व्याख्या बदलून टाकली. या चित्रपटात हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना ४४० व्होल्टचा जोरदार झटका दिला होता.
advertisement
2/7
हा चित्रपट म्हणजे 'दीवानगी'. 'दीवानगी' हा चित्रपट २५ ऑक्टोबर २००२ रोजी प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक अनीस बज्मी आणि निर्माते नितीन मनमोहन यांच्या या सायको थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ११ चित्रपटांपैकी एक ठरला होता.
advertisement
3/7
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण होते, अभिनेता अजय देवगण! अजयने या चित्रपटात 'तरंग भारद्वाज' नावाच्या खलनायकाचे पात्र साकारले होते. त्याचा सनकी आणि रहस्यमय अभिनय लोकांना खूप आवडला. विशेष म्हणजे, या दमदार निगेटिव्ह रोलसाठी अजय देवगणला फिल्मफेअरचा 'सर्वोत्कृष्ट खलनायक' पुरस्कार मिळाला होता.
advertisement
4/7
'दीवानगी' चित्रपटाची कथा एका खुनाच्या तपासावर आधारित आहे. प्रसिद्ध गायिका सरगम (उर्मिला मातोंडकर) तिच्या बालपणीचा मित्र आणि संगीत गुरू तरंग (अजय देवगण) याच्यावर असलेल्या खुनाच्या आरोपातून त्याला वाचवण्यासाठी धडपडते.
advertisement
5/7
सरगम, कोणताही केस न हरणारा प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर राज गोयल (अक्षय खन्ना) याच्याकडे ही केस सोपवते. राज, तरंगला भेटल्यानंतर त्याचा बचाव करण्यास तयार होतो. मात्र, यानंतर कथेला जो जबरदस्त ट्विस्ट मिळतो, तो प्रेक्षकांना संपूर्णपणे हादरवून टाकतो. एका सामान्य माणसाची चतुराई आणि त्याचा चालाखपणा कोणत्याही बलाढ्य शत्रूला धूळ चारू शकतो, हे या चित्रपटाने दाखवून दिले.
advertisement
6/7
'दीवानगी'ने नुकतीच २३ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले, "हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. त्याने त्याच्या काळात सस्पेन्स थ्रिलरला एका नव्या अंदाजात सादर केले होते. या सुंदर प्रवासाबद्दल मी आभारी आहे."
advertisement
7/7
इस्माइल दरबार यांचे संगीत आणि सलीम बिजनोरी, नुसरत बद्र यांचे गीतलेखन यामुळे 'दीवानगी' आजही आपल्या दमदार सस्पेन्स, शानदार अभिनय आणि संगीतासाठी ओळखला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Best Suspense Thriller : 23 वर्षांपूर्वीची थ्रिलर फिल्म, दृश्यमपेक्षाही तगडा सस्पेन्स, क्लायमॅक्स पाहून बसेल 440 वोल्ट झटका