TRENDING:

Marathi Movie : 'दशावतार'नंतर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' गाजवणार बॉक्स ऑफिस! ही घ्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांची लिस्ट

Last Updated:
Marathi Movie Release in This Week : दशावतार या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. त्यानंतर आता 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. पाहा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'सह या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांची यादी.
advertisement
1/8
'दशावतार'नंतर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' गाजवणार बॉक्स ऑफिस!
दशावतार या मराठी सिनेमानं मागील एक महिना बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. दशावतार हा सिनेमा नुकताच मल्याळम भाषेतही रिलीज झाला आहे.
advertisement
2/8
दशावतारनंतर मराठीतील एक बहुप्रतिक्षित सिनेमा येत्या आठवड्यात रिलीज होत आहे. त्याचबरोबर या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांविषयीही अधिक माहिती घेऊया.
advertisement
3/8
पुन्हा शिवाजीराजे भोसले - मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या यशानंतर अनेक वर्षांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
4/8
सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत आहे. त्याचप्रमाणे विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सयाजी शिंदे तसंच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
5/8
तू माझा किनारा - अभिनेता भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांच्या प्रमुख भूमिका असलेला तू माझा किनारा हा सिनेमा देखील 31 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
advertisement
6/8
बालकलाकार केया इंगळे देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नात्यांच्या भावविश्वात डोकावणारा कुटुंबकेंद्रित असलेला हा सिनेमा आहे.
advertisement
7/8
वेल डन आई - अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रमुख भूमिकेत असलेला वेल डन आई हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होतोय. आजच्या माॅडर्न युगातील आईची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट 'वेल डन आई' सिनेमात पाहायला मिळणार आहे.
advertisement
8/8
अभिनेत्री विशाखा सुभेदारबरोबरच या सिनेमात विजय निकम, जयवंत वाडकर, आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Movie : 'दशावतार'नंतर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' गाजवणार बॉक्स ऑफिस! ही घ्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांची लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल