IND vs AUS : 48 दिवसात एकही अर्धशतक नाही, तरी टीम इंडियात जागा फिक्स, 2 स्टार खेळाडूंनी वाढवलं टेन्शन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली टी-20 बुधवारी खेळवली जाणार आहे, पण दोन खेळाडूंच्या फॉर्मने भारतीय टीमचं टेन्शन वाढवलं आहे. मागचे 48 दिवस या दोन्ही खेळाडूंना अर्धशतकही करता आलेलं नाही.
advertisement
1/5

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 आधी भारतीय टीम मॅनेजमेंट दोन प्रमुख स्टार खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंतेत आहे, कारण टीम इंडियाचं यश या दोन खेळाडूंवर अवलंबून असणार आहे.
advertisement
2/5
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल बॅटिंगमध्ये संघर्ष करत आहेत. सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक रन करणारा तिसरा खेळाडू आहे. पण यावर्षी सूर्याची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.
advertisement
3/5
आयपीएल 2025 मध्ये सूर्याने मुंबई इंडियन्सना एकहाती प्ले-ऑफला पोहोचवलं. सर्व 16 सामन्यांमध्ये सूर्याने 25 किंवा त्यापेक्षा अधिक रन केल्या. पण भारताकडून सूर्याने यावर्षात 12 सामन्यांमध्ये फक्त 100 रन केल्या आहेत. 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरची सूर्याची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.
advertisement
4/5
शुभमन गिल आशिया कपमध्येही रन करण्यात अपयशी ठरला. 21 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात गिलने 28 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली, त्याशिवाय गिलला कोणतीही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
advertisement
5/5
गिल आणि सूर्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे, पण अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांच्या अलिकडच्या कामगिरीमुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे, पण गिल आणि सूर्याही फॉर्ममध्ये आले तर टीम इंडियाची सगळी चिंता मिटून जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 48 दिवसात एकही अर्धशतक नाही, तरी टीम इंडियात जागा फिक्स, 2 स्टार खेळाडूंनी वाढवलं टेन्शन!