Farmer Success Story: डोंगराळ शेतीत लढवलं डोकं, ऊभा केला नर्सरी उद्योग, शेतकऱ्याला 7 लाख नफा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
सुरुवातीला पाच गुंठ्यांमध्ये छोट्या प्रमाणात नर्सरी उभी केली. या नर्सरीमध्ये त्यांनी फुलझाडं, फळझाडं, औषधी वनस्पती आणि शोभिवंत झाडांची लागवड केली
advertisement
1/7

बीड जिल्ह्यातील चोरांबा गावातील श्रीहरी चव्हाण हे शेतकरी असून त्यांच्याकडे तब्बल दहा एकर शेती आहे. मात्र, त्यांच्या शेतजमिनीचा परिसर डोंगराळ असल्यामुळे शेतीमध्ये लागणारा खर्च अधिक आणि उत्पन्न अत्यल्प असेच चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत कायम होते.
advertisement
2/7
सततचा तोटा आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे श्रीहरी चव्हाण यांनी शेतीला पूरक पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच त्यांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला.
advertisement
3/7
सुरुवातीला पाच गुंठ्यांमध्ये छोट्या प्रमाणात नर्सरी उभी केली. या नर्सरीमध्ये त्यांनी फुलझाडं, फळझाडं, औषधी वनस्पती आणि शोभिवंत झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ स्थानिक गरजांनुसारच नव्हे तर बाजारपेठेचा विचार करून झाडांची निवड केली. चांगल्या प्रकारची झाडं, वेळेवर देखभाल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे श्रीहरी चव्हाण यांची नर्सरी गावातच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यांमध्येही प्रसिद्ध झाली.
advertisement
4/7
दरवर्षी त्यांच्याकडून हजारो रोपांची विक्री होते. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यावर आणि झाडांच्या गुणवत्तेवर त्यांचा नेहमी भर असतो. परिणामी, वर्षातून किमान सात लाख रुपयांचा निव्वळ नफा ते या व्यवसायातून कमावतात.
advertisement
5/7
केवळ पाच गुंठ्यांच्या जागेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवणे हे अनेकांसाठी प्रेरणादायक ठरले आहे. आज त्यांच्या नर्सरीतून शालेय संस्था, ग्रामपंचायती, शेतकरी आणि उद्यानप्रेमी झाडांची खरेदी करतात.
advertisement
6/7
श्रीहरी चव्हाण यांनी डोंगराळ भागातही यशस्वी शेती व्यवसायाची दिशा दाखवली आहे. शेतीतील अडचणींना न डगमगता, त्यांनी कल्पकतेच्या जोरावर नवा मार्ग स्वीकारला आणि त्यात यश मिळवले.
advertisement
7/7
त्यांचा हा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरला असून कमी जागेतील नफा मिळवणारा व्यवसाय म्हणजे नर्सरी याकडे आज अनेक तरुणांचा ओढा वाढताना दिसतो. श्रीहरी चव्हाण हे आज या क्षेत्रातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: डोंगराळ शेतीत लढवलं डोकं, ऊभा केला नर्सरी उद्योग, शेतकऱ्याला 7 लाख नफा