TRENDING:

Success Story : पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड, शेतकरी करतोय महिन्याला सव्वा लाख रुपये कमाई

Last Updated:
सात गाईंपासून सुरुवात केली. आजच्या घडीला शेळके यांच्याकडे 43 जर्सी गाई आहेत.
advertisement
1/5
पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड, शेतकरी करतोय महिन्याला सव्वा लाख रुपये कमाई
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंबेफळ येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम शेळके हे गेल्या 3 वर्षांपासून गाय पालन करून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांनी सात गाईंपासून सुरुवात केली. आजच्या घडीला शेळके यांच्याकडे 43 जर्सी गाई आहेत. या माध्यमातून 300 लिटर दूध संकलन होते. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला सुग्रास, लेबर असा सर्व खर्च वजा करून सव्वा एक लाख रुपये कमाई होते. तसेच इतर शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती शेळके यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
advertisement
2/5
कुंबेफळ येथे श्रीराम शेळके यांच्याकडे बागायती शेती आहे. मोसंबी, सिताफळ या फळबागातील झाडांना चांगल्या पद्धतीची फळे यावी यासाठी शेणखत 4 ते 5 लाख रुपयांचे विकत घ्यावे लागत होते, मात्र यामध्ये शेळके यांचा अधिक खर्च होत होता.
advertisement
3/5
त्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली आणि ती कल्पना सन 2022 मध्ये गाय पालनाच्या माध्यमातून अस्तित्वात आली. 7 गाईंपासून झालेली सुरुवात आजच्या घडीला 43 गाईंवर पोहोचली आहे.
advertisement
4/5
दूध व्यवसायामध्ये विशेष म्हणजे आता हाताने दूध काढायचे काम राहिले नाही, त्यासाठी गोठ्यामध्ये सांगडे बसवले जातात. येथे गाई येतात, खाद्य खातात, पाणी पितात आणि दूध काढल्यानंतर बाहेर निघून जातात. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला पूर्ण वेळ द्यायची गरज नाही आणि कमाई देखील चांगली होते, अशी प्रतिक्रिया देखील शेळके यांनी दिली.
advertisement
5/5
कमी जनावरांपासून सुरुवात करावी. गायपालन, शेळीपालन असो, या व्यवसायामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. दुग्ध व्यवसायाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन काम केले तर तो नफा देणाराच आहे. विशेषतः प्रयत्न करावा की सर्व जनावरांचे खाद्य घरचे असावे. तसेच मुक्त गोठा पद्धत वापरली पाहिजे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास जनावरांना दिल्यास त्यामध्ये चारा खायला देणे, पाणी देणे अशी कामे केली जातात आणि उर्वरित दिवसभराच्या वेळामध्ये शेतीतील सर्व कामे करता येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड, शेतकरी करतोय महिन्याला सव्वा लाख रुपये कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल