TRENDING:

शेतकऱ्यांनो! मोबाईलवर हा मेसेज, लिंक आली तर ओपन करु नका, क्लिक करताच खात्यातील पैसे होणार गायब

Last Updated:
Agriculture News : सोशल मीडियावर पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फसवी (Fake) लिंक मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
advertisement
1/6
मोबाईलवर हा मेसेज,लिंक आली तर ओपन करु नका! क्लिक करताच खात्यातील पैसे होणार गायब
सोशल मीडियावर पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फसवी (Fake) लिंक मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. ‘फ्री गिफ्ट’ किंवा ‘बक्षीस योजना’ अशा नावाखाली ही लिंक वापरकर्त्यांना आकर्षित करते. मात्र, या लिंकवर क्लिक केल्यानंतर अनेकांचे बँक खाते रिकामे झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे महाडीबीटीधारक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
2/6
सायबर फसवणुकीचा नवा प्रकार - गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. फसवणूक करणारे आता अधिक कौशल्यपूर्ण पद्धतीने नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. या नव्या प्रकरणात एका खासगी कंपनीच्या नावाने फ्री गिफ्ट देण्याचे आमिष दाखवणारी लिंक व्हॉट्सअॅपवर पाठवली जात आहे. अनेकांनी ही लिंक विश्वासाने उघडल्याने त्यांच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यांवर हॅकर्सचा ताबा मिळत आहे.
advertisement
3/6
महाडीबीटीकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार, शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. या लिंकमध्ये दडलेले सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करून त्यावरील संपूर्ण कंट्रोल हॅकरकडे देतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती, OTPs, बँक डिटेल्स आणि व्यवहारांची माहिती चोरीला जाऊ शकते.
advertisement
4/6
<strong>क्लिक केल्यानंतर काय होतं?</strong>  लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमधील सुरक्षा प्रणाली हॅक होते. हॅकर त्या डिव्हाइसचा संपूर्ण ताबा घेतो. इतकेच नाही, तर हीच लिंक तुमच्या मोबाईलमधून स्वयंचलितपणे (auto-forward) तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुपमध्ये पाठवली जाते. त्यामुळे तुमच्या संपर्कातील इतर लोकांचे मोबाईलही धोक्यात येतात.
advertisement
5/6
जर कोणी चुकीने अशा लिंकवर क्लिक केले असेल, तर त्वरित खालील उपाय करावेत. मोबाईलचे इंटरनेट तत्काळ बंद करावे. मोबाईलच्या सेटिंग्जमधून अॅप्स यादी तपासावी. एखादे अनोळखी किंवा संशयास्पद अॅप दिसल्यास ते लगेच अनइंस्टॉल करावे. मोबाईल अँटीव्हायरसद्वारे पूर्ण स्कॅन करावा. बँक खात्यांतील व्यवहार तपासून संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित बँक आणि सायबर पोलिसांना कळवावे.
advertisement
6/6
शेतकऱ्यांना सूचना काय? महाडीबीटीकडून शेतकऱ्यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की, सरकारी योजना किंवा गिफ्टविषयी कोणतीही माहिती फक्त अधिकृत वेबसाइट्स किंवा अॅप्सवरूनच तपासावी. अनोळखी कंपनीकडून आलेल्या लिंक, मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
शेतकऱ्यांनो! मोबाईलवर हा मेसेज, लिंक आली तर ओपन करु नका, क्लिक करताच खात्यातील पैसे होणार गायब
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल