TRENDING:

मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी, नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड करा, ७० दिवसांत ३ ते ५ लाख रु कमवा

Last Updated:
Agriculture News : रब्बी हंगामाची सुरुवात होताच शेतकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणते पीक लावावे जे लवकर तयार होईल आणि बाजारात चांगला दर मिळवून देईल?
advertisement
1/5
प्रचंड मागणी! नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड करा, ७० दिवसांत ३ ते ५ लाख रु कमवा
रब्बी हंगामाची सुरुवात होताच शेतकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणते पीक लावावे जे लवकर तयार होईल आणि बाजारात चांगला दर मिळवून देईल? अशावेळेस हिरवी मिरचीचे पीक नोव्हेंबर महिन्यात लागवडीसाठी सर्वात फायदेशीर ठरते. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती यांचा योग्य वापर केल्यास शेतकरी ७५ ते ९० दिवसांत चांगला नफा कमावू शकतात.
advertisement
2/5
नोव्हेंबर हा उत्तम लागवड - काळ नोव्हेंबर महिन्यात हवामान थंड आणि दिवस छोटे असतात. या काळात मिरचीच्या रोपांची वाढ जलद होते आणि फुलोरा लवकर येतो. नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली आणि विदर्भातील अनेक भागात नोव्हेंबरच्या सुरुवातीला मिरची लागवड केली जाते. या काळात पिकावर कीडरोगाचा त्रास कमी होतो आणि पाणीही जास्त लागत नाही. त्यामुळे खर्च आपोआप कमी होतो.
advertisement
3/5
लागवड प्रक्रिया - हलकी, गाळयुक्त आणि पाणी न साचणारी जमीन मिरचीसाठी योग्य ठरते. २५-३० दिवसांच्या रोपांची लागवड केली जाते. दोन ओळींमधील अंतर १.५ फूट आणि दोन रोपांमधील अंतर १ फूट ठेवल्यास योग्य वाढ होते. तसेच ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यास पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ होते. गांडूळ खत, जीवामृत आणि नीम अर्क वापरल्यास रासायनिक खतांचा खर्च कमी होतो आणि मिरची अधिक टिकाऊ होते.
advertisement
4/5

5/5
कमी दिवसांत नफा -  हिरवी मिरचीचे पहिले उत्पादन लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसांत सुरू होते. नोव्हेंबरमध्ये लावलेले पीक जानेवारीत बाजारात येते, तेव्हा मिरचीला चांगला दर मिळतो. सरासरी बाजारभावानुसार हिरवी मिरचीचा दर ३० ते ६० रु प्रति किलो असतो. एका एकरात सरासरी ८ ते १० टन उत्पादन मिळते. म्हणजेच, एका एकरातून ३ ते ६ लाखांपर्यंतचा एकूण उत्पन्न मिळू शकतो. उत्पादन खर्च साधारण ७०,००० ते १ लाख येतो, म्हणजेच निव्वळ नफा २ ते ५ लाख रु सहज मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी, नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड करा, ७० दिवसांत ३ ते ५ लाख रु कमवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल